Home शासकीय ऐश्वर्या राय बच्चनला सिन्नर तहसीलदारांनी बजावली नोटीस

ऐश्वर्या राय बच्चनला सिन्नर तहसीलदारांनी बजावली नोटीस

2 second read
0
0
126

no images were found

ऐश्वर्या राय बच्चनला सिन्नर तहसीलदारांनी बजावली नोटीस

नाशिक: प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या तहसीलदारांनी नोटीस पाठवली आहे. सिन्नरमधील जमीनीचा कर थकवल्याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन यांची नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात असलेल्या ठाणेगाव जवळ आडवाडीमध्ये एक जमीन आहे. अडवाडीच्या डोंगराळ भागात सुमारे एक हेक्टर २२ एकर जमीन आहे आणि याच जमीनीच्या एक वर्षाच्या कराचे २२ हजार रुपये थकल्याने नोटीस पाठविण्यात आली आहे. प्रशासनाने ऐश्वर्या राय यांच्यासोबत इतरही बाराशे मालमत्ता धारकांना नोटीस पाठविली आहे. मार्च अखेरीस वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने ही नोटीस ऐश्वर्या राय बच्चन यांना पाठविण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचे तहसीलदार एकनाथ सांगळे यांनी ऐश्वर्या रायला ही नोटीस पाठविली आहे. नोटीस पाठवल्यानंतर १० दिवसांच्या आत कर भरला नाही तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल; असा इशाराही या नोटीसमध्ये नोंद करण्यात आला आहे. २०२२- २३ या वर्षाचा २१ हजार ९६० आणि नोटीशीचा १० रुपये खर्च असा एकूण २१,९७० रुपयांचा कर बाकी असल्याने तहसीलदारांनी नोटीस पाठवली आहे.

मार्च अखेरीस करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाकडून कर वसूल करण्यासाठी थकबाकीदारांना नोटीस पाठवल्या जातात तसेच कारवाई देखील केली जाते. त्यामुळे ऐश्वर्या राय-बच्चनला देखील सिन्नर तहसीलदारांनी कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नोटीस पाठवली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …