
no images were found
कल्याणमध्ये इमारतीस लागलेल्या आगीत आजी, नातीचा मृत्यू
मुंबई : कल्याण येथे एका इमारतीमध्ये आग लागून दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना मध्यरात्री घडली. मध्यरात्री सुमारे ३.३० च्या दरम्यान कल्याणच्या घास बाजार येथील ‘शफिक खोटी मिटी’ या इमारतीच्या ३ऱ्या मजल्यावर ही आग लागली. येथे आजी आणि नात दोघीच राहत होत्या त्या दोघींचा या आगीत मृत्यू झाला आहे.
या आगीच्या दुर्घटनेत खातिमा माईनकर आणि इब्रा शेख या आजी-नातीचा मृत्यू झाला. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल पाचारण करण्यात आले तसेच स्थानिकांच्या मदतीने आग विझवण्यात त्यांना यश मिळाले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आजी आणि नात या दोघीच रहात होत्या. रात्री सुमारे १ वाजता लाईट गेली होती. जवळ जवळ २ तासानंतर लाईट आल्यावर अचानकपणे घरातील हॉलमध्ये प्रथम आग लागली. आजी आणि नात या दोघी बेडरुममध्ये झोपल्या होत्या. धूर आल्याचे लक्षात आल्यानंतर त्या दोघींनी खोलीबाहेर पडण्याचा प्रयत्न केला. परंतु हॉलला आग लागल्याने दोघीना बाहेर पडता आले नाही. दरम्यान आगीचा भडका उडाल्याने तसेच धुरामुळे दोघी होरपळून गुदमरल्या.