Home शासकीय गट-क कृषी सेवक संवर्गातील 250 पदांसाठीची गुणवत्तायादी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध

गट-क कृषी सेवक संवर्गातील 250 पदांसाठीची गुणवत्तायादी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध

6 second read
0
0
33

no images were found

गट-क कृषी सेवक संवर्गातील 250 पदांसाठीची गुणवत्तायादी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध

 

कोल्हापूर  : कृषी विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर कार्यालयाच्या आस्थापनेवरील गट-क कृषीसेवक संवर्गातील 250 पदांसाठीची जाहिरात (क्रमांक 3385/2023) दिनांक 11/8/2023 रोजी कृषि विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने आय.बी.पी.एस. कंपनी मार्फत दि. 16 व 19 जानेवारी 2024 रोजी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली आहे. या परीक्षेच्याअनुषंगाने आय.बी.पी.एस. कंपनीकडून प्राप्त गुणांनुसार उमेदवारांची अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी व किमान 45 टक्के गुणांची अहर्ताधारण करणाऱ्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय गुणवत्तायादी कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. कृपया उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक बसवराज बिराजदार यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…