
no images were found
जगातील सर्वात सुंदर महिला अभिनेत्री जीना लोलोब्रिगिडा यांचे निधन
जगातील सर्वात सुंदर महिला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध इटालियन अभिनेत्री जीना लोलोब्रिगिडा यांचे वयाच्या ९५ वर्षी निधन झाले आहे. युरोपियन सिनेसृष्टीत ५० आणि ६० व्या शतकात जीना लोलोब्रिगिडा यांनी भरपूर हिट चित्रपटात भूमिका गाजविली. त्यांची २० व्या शतकातील मोनालिसा अशीही ओळख त्याकाळी होती. त्यांच्या निधनाने हॉलिवूडला धक्का बसला आहे. अनेक कलाकारांकडून त्यांच्या निधनावर शोक व्यक्त होत आहे. जिना लोलोब्रिगिडा यांचा मृत्यू कशामुळे झाला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
जगातील सर्वात सुंदर महिला म्हणून त्यांना ओळखले जायचे. इटलीत जिना लोलोब्रिगिडा यांनी दुसऱ्या महायुद्धानंतर चित्रपटात छोट्या भूमिकेपासून सुरुवात केली. त्यानंतरच्या काळात त्यांना प्रसिद्धी मिळत गेली. त्या ५० ते ६० या दशकात युरोपियन चित्रपटातील सर्वात मोठ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून त्यांची ख्याती आहे. अनेक सौंदर्य स्पर्धांमध्येही त्यांचा सहभाग होता. जीना लोलोब्रिगिडाचे टोपणनाव ‘लोलो’ असून सर्वजण त्यांना ‘लोलो’ याच नावाने संबोधित असत.