Home सामाजिक चाकण शहरामध्ये बिबट्याचे दर्शन, नागरिकांमध्ये दहशत

चाकण शहरामध्ये बिबट्याचे दर्शन, नागरिकांमध्ये दहशत

0 second read
0
0
59

no images were found

चाकण शहरामध्ये बिबट्याचे दर्शन, नागरिकांमध्ये दहशत

पुणे : जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर हे तालुके बिबट्याचे वास्तव्य असलेले समजले जातात. त्यातच चाकण शहरात असणाऱ्या एकता नगर परिसरात रात्रीच्या सुमारास बिबट्या दिसल्याने नागरिकांत मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याच्या डरकाळ्याचा आवाजाने नागरिक दहशती खाली असल्याचे पहायला मिळत आहे.
एकता नगर परिसरातील ग्लॅडिओलस इंग्लिश मीडियम स्कूलच्या परिसरातील उसाच्या शेतात बिबट्याने नागरिकांना दर्शन दिले आहे. हा बिबट्या मोठ्या आवाजात डरकाळी फोडताना पहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे बंद केले आहे. दिवसेंदिवस बिबट्या चे मानवी वस्तीत दर्शन होऊ लागले आहे. अनेक भागात बिबट्याच्या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर अनेक जण यात जखमी देखील झाले आहेत.
जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड या तालुक्यात अनेकदा शेतात नागरिकांना बिबट्याचे दर्शन होत असते. मात्र, बिबट्याचे आता शहरात देखील दर्शन होऊ लागले आहे. चाकण येथे औद्योगिक वसाहत असल्याने मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मानवी वस्ती आहे. अनेक राज्यातून नागरिक कामासाठी येथे स्थायिक आहेत. त्यातच शहरातच बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीती पसरली आहे. बिबट्याच्या डरकाळ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर ऐकायला येत असून वनविभागाने या बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा आणि बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

विद्यापीठात ‘जीएसटी’च्या अनुषंगाने २३ मार्चपासून राष्ट्रीय चर्चासत्र

विद्यापीठात ‘जीएसटी’च्या अनुषंगाने २३ मार्चपासून राष्ट्रीय चर्चासत्र कोल्हापूर,(प्रति…