Home स्पोर्ट्स महाराष्ट्र केसरी पंचाला पोलिस शिपायाने दिली धमकी

महाराष्ट्र केसरी पंचाला पोलिस शिपायाने दिली धमकी

0 second read
0
0
167

no images were found

महाराष्ट्र केसरी पंचाला पोलिस शिपायाने दिली धमकी

पुणे : महाराष्ट्र केसरीत सिकंदर शेख विरोधात चार गुण दिल्याने पंच मारूती सातव यांना धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिस दलातील शिपाई संग्राम कांबळे यांनी फोन वरून कुस्ती स्पर्धेत पंच यांना धमकी दिली. फोन रेकॉर्डिग देखील समोर आली आहे. संग्राम कांबळे यांनी सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांचा कुस्तीतील पंच मारुती सातव यांना फोन करून लाज काढली.
धमकी नंतर पंच मारूती सातव याने महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या समिती अध्यक्षांकडे तक्रार अर्ज केला. या तक्रारीचा अर्ज संपूर्ण प्रकरणी संदीप भोंडवे, महाराष्ट्र केसरी स्पर्धा समिती कडून कोथरूड पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. माती विभागातील सोलापूरचा सिकंदर शेख आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड यांच्यात उपांत्य सामना पार पडला होता. महेंद्र गायकवाडने दुसऱ्या फेरीत ४ गुण मिळवत सिकंदर शेखवर ५-४ अशी आघाडी घेतली पण महेंद्र गायकवाडने लावलेली बाहेरील डांग हा डाव ही व्यवस्थीत झाला नव्हता. मग चार गुण कशाचे दिले गेले? असे प्रश्न अनेकांनी उपस्थित केले होते. याचा जाब विचारण्यासाठी संग्राम कांबळे यांनी थेट पंच मारुती सातव यांना धमकी दिली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अलिबाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न -वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

अलिबाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न -वैद्यक…