no images were found
प्रलंबित प्रकरणांचा पाठपुरावा होणे आवश्यक -जिल्हाधिकारी
कोल्हापूर : अनुसूचित जाती आणि जमाती अधिनियमांतर्गत जिल्ह्यात जी प्रलंबित प्रकरणे आहेत अशा प्रकरणांचा पाठपुरावा करून संबंधितावर विहित मुदतीत कारवाई करावी तसेच पिडितांना लवकरात लवकर न्याय मिळू शकेल याबाबत कार्यवाही करावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी दिले .
जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक आज आयोजित करण्यात आली होती . जिल्हाधिकारी म्हणाले,पोलीस तपासावरील सर्व प्रकरणांचा आवश्यक तो तपास लवकरात लवकर पूर्ण करावा. विहित कालावधीत दोषींवर दोषारोपपत्र दाखल करण्याच्या दृष्टीने पोलीस विभागाने कार्यवाही करावी तसेच तपासावरील प्रकरणांना गती द्यावी.कागदपत्रांच्या अभावी प्रलंबित असलेल्या प्रकरणांसाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी .
सद्यस्थितीत पोलीस तपासावर 11 प्रकरणे प्रलंबित असल्याचे माहिती समाज कल्याण आयुक्त सचिन साळे यांनी या बैठकीत दिली तर ॲट्रॉसिटीच्या अनुषंगाने गावोगावी जनतेचे प्रबोधन करण्यात यावे अशी सूचना या समितीचे अशासकीय सदस्य संजय कांबळे यांनी केली . या आढावा बैठकीसाठी होम डिवायएसपी तानाजी सावंत,डॉ सुनिल कुरुंदवाड,सरकारी विधिज्ञ पी.जे.जाधव, पो.नि.नयना पाटील , एलसीबी पथकाचे निवृत्ती माळी यांच्यासह इतर अशासकीय सदस्य उपस्थित होते .