Home संस्कृतिक शिवाजी विद्यापीठात सांस्कृतिक आविष्कारांतून गुरूंप्रती कृतज्ञता

शिवाजी विद्यापीठात सांस्कृतिक आविष्कारांतून गुरूंप्रती कृतज्ञता

2 second read
0
0
5

no images were found

शिवाजी विद्यापीठात सांस्कृतिक आविष्कारांतून गुरूंप्रती कृतज्ञता

कोल्हापूर, : शिवाजी विद्यापीठात गुरूपौर्णिमेनिमित्त विविध सांगितिक व सांस्कृतिक कलाविष्कारांतून विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त केली. शिवाजी विद्यापीठ कल्चरल क्लब अंतर्गत संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागात गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून काल (दि. २९) विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमा सोहळा अत्यंत मंगलमय व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला.

या सोहळ्यात भरतनाट्यम नृत्यातून विद्यार्थ्यांनी ‘श्लोकांजली’ सादर केली आणि आई-वडील, शिक्षक गुरुजनांवर आधारित कथ्थक नृत्यही प्रस्तुत केले. ‘गणेश वंदना’, ‘हरी म्हणा गोविंद म्हणा’ हे भक्तिगीत, जिवलगा कधी रे येशील तू, धुंदी कळ्यांना, निगाहें मिलाने को जी चाहता है, चन्दन सा बदन, इत्यादी हिंदी- मराठी गाणी तसेच राग यमनमधील बंदिशींचे सुरेल सादरीकरण केले. देवांग मराठे आणि प्रसाद सोनटक्के यांची बहारदार तबला जुगलबंदी रंगली. त्रिगुण पुजारी यांनी हार्मोनियम सोलो वादनाद्वारे राग मधुवंती सादर केला. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी सामुहिक हार्मोनिअम वादनाद्वारे राग मालकंस सादर केला. नाट्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी गुरु-शिष्याच्या नात्यावर आधारित हृदयस्पर्शी नाटिका तसेच व्यंकटेश माडगूळकरांच्या कथेवर आधारित ‘झेल्या’ ही लघुनाटिका सादर केली. चित्रकलेच्या विद्यार्थ्यांनी विविध सांगीतिक वाद्यांच्या साथीसह सामूहिक पेंटिंगचे प्रात्यक्षिक दाखवून सर्वांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘गुरु कृतज्ञता सोहळा’ पार पडला. विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचा सत्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले.

अधिविभागप्रमुख डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शिरीष कुलकर्णी व श्रुती खोचीकर यांनी सूत्रसंचालन केले. विक्रम परीट, संदेश गावंदे व ओंकार सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे संगीत संयोजन केले. मल्हार जोशी, विकास कांबळे यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. कार्यक्रमाला अधिविभागाचे शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्रशासकीय सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In संस्कृतिक
Comments are closed.

Check Also

आयसीआयसीआय प्रु आयप्रोटेक्ट स्मार्ट प्लस: कमी प्रीमियममध्ये 10 वर्षांचे लाइफ कव्हर मिळवून छोट्या कालावधीच्या आर्थिक जबाबदाऱ्या सुरक्षित करण्याचा स्मार्ट मार्ग

आयसीआयसीआय प्रु आयप्रोटेक्ट स्मार्ट प्लस: कमी प्रीमियममध्ये 10 वर्षांचे लाइफ कव्…