no images were found
पाणीपट्टी विशेष वसुलीमोहिमे अंतर्गत रेल्वे विभागाकडून 53 लाख वसूल
कोल्हापूर : पाणीपट्टी विशेष वसुली धडक मोहिमे अंतर्गत रेल्वे विभागाकडून 53 लाख 34 हजार 990/- वसूल करण्यात आले. तर शहरातील इतर 23 नळ कनेक्शन खंडीत करुन इतर थकबाकीदारांकडून दि.7 ते 10 ऑक्टोंबर 2022 अखेर रु.64 लाख 15 हजार 615/- रक्कम वसुल करण्यात आली. यामध्ये शाहूनगर, फुलेवाडी रिंगरोड, शाहु कॉलनी, चंबुखडी, विशालनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, न्यू शाहूपूरी, ताराबाई पार्क, शिवाजी पार्क, कदमवाडी या भागामधील 82 कनेक्शनधारकांकडून थकीत बिलापोटी रु.64 लाख 15 हजार 615 इतकी थकीत रक्कम वसुली करण्यात आली. त्याचबरोबर सुलोचना माने, सदाशिव देवकुळे, उज्वला सुतार, जयेश बारोट, ताहीरहुसेन कुरणे, मेघदूत अपार्टमेंट, भाग्यश्री अपार्टमेंट, संजीव कुलकर्णी, हर्षद भेदा, श्रीपती लिंग्रज, बाळासाहेब शिंदे, जयसिंग कांबळे, शारदा सुर्यवंशी, अंबुताई काशिद, कय्यूम जमादार, लक्ष्मीबाई सांगावकर, रमेश पोवार, विष्णू पोवार, संभाजी दिंडे, बनाबाई वड्ड, सचिन घोसाळकर, अमृत भोगन, महादेवमुर्ती घुमास्ते अशा 23 नागरीकांची नळ कनेक्शने थकबाकीपोटी खंडीत करण्यात आली आहेत.
हि कारवाई प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, जल अभियंता हर्षजित घाटगे व अधिक्षक प्रशांत पंडत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदरची वसुली मोहिम येथून पुढेही सुरु राहणार असून सर्व थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. तरी, सर्व थकबाकीदारांनी आपली थकीत त्वरित भरुन कनेक्शन बंद करणे, मिळकतीवर बोजा नोंद करणे यासारखे कटू प्रसंग टाळावेत असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.