Home मनोरंजन कलर्स मराठीवर   मातीतली प्रेमकथा “शेतकरीच नवरा हवा”चा शुभारंभ

कलर्स मराठीवर   मातीतली प्रेमकथा “शेतकरीच नवरा हवा”चा शुभारंभ

0 second read
0
0
221

no images were found

कलर्स मराठीवर   मातीतली प्रेमकथा “शेतकरीच नवरा हवाचा शुभारंभ

मुंबई : आजवर आपणं अनेक प्रेमकथा बघितल्या… भिन्न विचारसरणीच्या दोन व्यक्तींमधील प्रेम असो वा वयाची वा जात – धर्म याची मर्यादा न जुमानता फुलेलं प्रेम असो वा फक्त बाह्यरुपावर हुरळून न जाता माणसाचा स्वभाव बघून प्रेमात पडलेली माणसं असोत. प्रेम हे सहवासाने जडतंच. पण आजच्या काळात प्रेमाची व्याख्या जरा बदलेली दिसते आहे. मुलगा किंवा मुलगी त्यांच्या होणाऱ्या जोडीदारा बद्दलच्या अपेक्षा ठरलेल्या असतात. आज २१ व्या शतकात सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध असताना देखील सामान्य माणूस असो वा गडगंज संपत्ती असलेला माणूस असो तो शेतकऱ्यांनी पिकवलेल्या अन्नधान्यावर विसंबून आहे. शेतकरी हा शब्द ऐकताच आपला माणूस, जिव्हाळा, प्रेम आणि आदर अशा भावना आपल्या मनात येतात तर दुसरीकडे डोळ्यासमोर येतं ते त्यांच्या हालअपेष्टा, त्यांचे काबाड कष्ट, रात्रंदिवस त्याचे परिस्थितीशी झटणं. आपण बातम्यांमध्ये त्यांच्या  होणाऱ्या आत्महत्या बघतो आणि एक विचार येऊन जातो तोच मनाला चटका लावून जातो आज त्यांच्यामुळे आपण चार घास खाऊ शकतो त्यांची हि परिस्थिती आहे. पण, हे सगळं असताना जिथे मुलींना शेतकरी नवरा नको असतो, शेतकऱ्याच्या मुलाला शेतकरी पण मुलगी द्यायला तयार नाही तिथे एका उच्चभ्रू घराण्यातील शहरी, सुशिक्षित मुलगी, जेव्हा म्हणते मला शेतकरीच नवरा हवा तेव्हा काय होईल ? आज समाजामध्ये अश्या किती मुली आहेत ज्यांना शेतकरी मुलाशी लग्न करायचे आहे ? कसा असेल रेवा आणि सयाजीचा प्रवास ? कसं फुलेलं यांच्यातील प्रेम ? शुभारंभ होत आहे मातीतल्या प्रेमकथेचा… वास्तवाच्या जवळ घेऊन जाणारी आणि प्रत्येकाला पुन्हाएकदा विचार करण्यास भाग पडणारी मालिका… जिथे बघायला मिळणार आहे नाती आणि माती जपणाऱ्या शेतकऱ्याची हळुवार प्रेमकथा. रेवा आणि सयाजीच्या अनोख्या प्रेमाचा गंध संपूर्ण महाराष्ट्राभर दरवळणार.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…