स्विच मोबिलिटी दोन नवीन लो-फ्लोर इलेक्ट्रिक सिटी बस लाँचसह शहरी प्रवासाची व्याख्या बदलणार कोल्हापूर, : अशोक लेलँडची सहायक कंपनी आणि हिंदुजा ग्रुपचा भाग असलेल्या, तसेच इलेक्ट्रिक बस आणि हलक्या वाणिज्यिक वाहनांचे आघाडीचे निर्माता असलेल्या स्विच मोबिलिटी लि.ने आज आपल्या आधुनिक इलेक्ट्रिक बस स्विच ईआयवी१२ या भारतीय बाजारासाठीची लो-फ्लोर इलेक्ट्रिक सिटी बसचे अनावरण केले. ही भारतातील पहिली लो-फ्लोर सिटी बस …