Home औद्योगिक रॉयल एनफिल्‍डकडून पूर्व-मालकीच्‍या मोटरसायकल व्‍यवसाय ‘रिओन’चा विस्‍तार; 

रॉयल एनफिल्‍डकडून पूर्व-मालकीच्‍या मोटरसायकल व्‍यवसाय ‘रिओन’चा विस्‍तार; 

3 min read
0
0
19

no images were found

रॉयल एनफिल्‍डकडून पूर्व-मालकीच्‍या मोटरसायकल व्‍यवसाय ‘रिओन’चा विस्‍तार; 

●      नवीन रॉयल एनफिल्‍ड मोटरसायकलमध्‍ये अगप्रेड करू पाहणाऱ्या ग्राहकांसाठी एक्‍स्‍चेंज फायद्यांसह लॉयल्‍टी प्रोग्राम लाँच

●      रिओन परिपूर्ण ब्रँड आश्‍वासन, निष्‍पक्ष किंमत हमी, सुलभ हस्‍तांतरण आणि कागदपत्र व्‍यवहार देते, ज्‍यामधून विनासायास अनुभवाची खात्री मिळते

●       

रॉयल एनफिल्‍ड या मध्‍यम आकाराच्‍या (२५० सीसी – ७५० सीसी) मोटरसायसकल विभागातील जागतिक अग्रगण्‍य कंपनीने आज त्‍यांचा पूर्व-मालकीच्‍या मोटरसायकल व्‍यवसाय ‘रिओन’च्‍या मोठ्या विस्‍तारीकरणाची घोषणा केली. भारतातील २३६ शहरांमधील ग्राहक व आरई प्रेमी आता सोईस्‍करपणे त्‍यांच्‍या विद्यमान मोटरसायकल्‍स विकू शकतील आणि रॉयल एनफिल्‍डच्‍या उत्‍साहवर्धक व क्षमतापूर्ण लाइन-अपमधून नवीन राइडमध्‍ये अपग्रेड करू श्‍कातील. पूर्व-मालकीच्‍या रॉयल एनफिल्‍डच्‍या खरेदी-विक्रीसाठी पारदर्शक प्‍लॅटफॉर्म रिओन २०२३ मध्‍ये निवडक शहरांत लाँच करण्‍यात आला.

          रिओन भारतातील २४ राज्‍ये व केंद्रशासित प्रदेशांतील २३६ शहरांमधील रॉयल एनफिल्‍डच्‍या ४७५ डिलरशिप्‍सच्‍या माध्‍यमातून ग्राहकांसाठी उपलब्‍ध असेल. यामध्‍ये मोटरसायकल्‍सची श्रेणी देण्‍याप्रती कंपनीची कटिबद्धता कायम राखली जाईल, ज्‍यामध्‍ये विश्‍वासार्हता आणि अस्‍सल मोटरसायकलिंग अनुभवाचा समावेश आहे. नेटवर्क विस्‍तारीकरणासोबत रॉयल एनफिल्‍डने रिओनच्‍या आरई-टू-आई एक्‍स्‍चेंजच्‍या माध्‍यमातून पूर्व-मालकीच्‍या रॉयल एनफिल्‍ड मोटरसायकलला नवीन मोटरसायकलमध्‍ये अपग्रेड करण्‍याची इच्‍छा असलेल्‍या ग्राहकांसाठी एक्‍स्‍चेंज बेनीफिट्ससह पहिला लॉयल्‍टी प्रोग्राम देखील लाँच केला.

          रिओनच्‍या विस्‍तारीकरणाबाबत मत व्‍यक्‍त करत रॉयल एनफिल्‍डचे प्रमुख व्‍यावसायिक अधिकारी यदविंदर सिंग गुलेरिया म्‍हणाले, “रॉयल एनफिल्‍डमध्‍ये आम्‍ही राइडिंगप्रेमींना रॉयल ए‍नफिल्‍डचे मालक बनण्‍याचा आनंद देण्‍याची खात्री घेण्‍यासाठी सतत नाविन्‍यपूर्ण बदल करतो. वर्षभरात फक्‍त निवडक शहरांमधून २३६ हून अधिक शहरांपर्यंत रिओनच्‍या विस्‍तारीकरणामधून पहिली मोटरसायकल असो किंवा अपग्रेड करायचे असो, राइडिंगप्रेमींना रॉयल एनफिल्‍डचे मालक होण्‍याचा विनासायास व पारदर्शक मार्ग देण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते.”

         रिओन राइडिंग प्रेमींमधील रॉयल एनफिल्‍ड मोटरसायकल्‍सप्रती वाढती आवड व महत्त्वाकांक्षेची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. हा प्‍लॅटफॉर्म पूर्व-मालकीच्‍या रॉयल एनफिल्‍ड खरेदी करण्‍याची इच्‍छा असलेल्‍या ग्राहकांसाठी एक-थांबा सोल्‍यूशन आहे, ज्‍यामागे विश्‍वास, सोयीसुविधा व परिपूर्ण ब्रँड आश्‍वासन देण्‍यासोबत मालकीहक्‍क आणि अपग्रेड्स सोपे करण्‍याचा मनसुबा आहे. रिओन इन-स्‍टोअर व ऑनलाइन पर्याय देते, ज्‍यामुळे ग्राहकांना त्‍यांच्‍या रॉयल एनफिल्‍ड मोटरसायकल्‍सची खरेदी-विक्री किंवा एक्‍स्‍चेंज करणे सोपे जाते. विक्रेते ऑनलाइन अर्ज भरत कोणत्‍याही ठिकाणी त्‍यांच्‍या मोटरसायकलसाठी विनामूल्‍य तपासणीचे नियोजन करू शकतात. रिओनने नॉन-आरई मोटरसायकल्‍सच्‍या एक्‍स्‍चेंजची सुविधा देण्‍यासाठी अॅड्रॉइड ऑटो, समिल अँड इन्‍स्‍टाबिडसोबत देखील सहयोग केला आहे. रिओनवर सूचीबद्ध प्रत्‍येक पूर्व-मालकीची मोटरसायकल रॉयल एनफिल्‍डकडून सत्‍यापित आहे आणि २०० हून अधिक टेक्निकल व मेकॅनिकल तपासण्‍या करण्‍यात येतात, तसेच अधिकृत रॉयल एनफिल्‍ड सर्विस सेंटर्समध्‍ये जेन्‍यूएन पार्ट्सचा वापर करत सुधारण्‍यात येतात. याव्‍यतिरिक्‍त, या मोटरसायकल्‍स १२ महिन्‍यांच्‍या ब्रँड वॉरंटीसह येतात, ज्‍यामध्‍ये दोन कॉम्‍प्‍लीमेण्‍टरी सर्विसेसचा समावेश आहे. 

 खरेदी-विक्रीसाठी किंवा या प्रोग्रामबाबत अधिक माहितीसाठी येथे लॉग ऑन करा: royalenfield.com/reown

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In औद्योगिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…