
no images were found
संगणक कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन
कुंकोलिम, गोवा : भारतातील प्रमुख निकेल उत्पादक असलेल्या वेदांता निकोने, वेदांता फाउंडेशनच्या सहकार्याने, गोव्यातील कुंकोलिम एज्युकेशन सोसायटीच्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयात संगणक कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन केले. हा उपक्रम कंपनीच्या सीएसआर अंतर्गत संगणक साक्षरता कार्यक्रमाचा एक भाग आहे, जो व्यवसायिक प्रशिक्षण प्रकल्पांतर्गत सुरू करण्यात आला आहे. ज्याचा उद्देश डिजिटल अंतर कमी करणे आणि डिजिटल कौशल्ये प्रदान करून तरुणांना रोजगारक्षम बनवणे आहे.या केंद्रामध्ये 10 संगणकांची व्यवस्था करण्यात आली असून 200 हून अधिक तरुणांना याचा लाभ होईल. येथे ऑफिस मॅनेजमेंट, अॅडव्हान्स एक्सेल, फायनान्शियल अकाउंटिंग, वेब डिझायनिंग आणि डिजिटल मार्केटिंग यासारख्या प्रमुख क्षेत्रांतील प्रमाणित कोर्सेस शिकवले जातील. हे कोर्स तरुणांना बाजारपेठेतील मागणीनुसार रोजगाराभिमुख कौशल्ये प्रदान करतील.
श्री. प्रशुक जैन, सीओओ, वेदांता निको वेदांता निकोच्या सीएसआर उपक्रमांबद्दल बोलताना म्हणाले:“वेदांता निकोमध्ये आम्ही स्थानिक समुदायांना सशक्त करण्यासाठी वचनबद्ध आहोत. हे संगणक कौशल्य प्रशिक्षण केंद्र युवा पिढीच्या कौशल्य विकासाला चालना देण्यावर आमचे लक्ष केंद्रित करते, ज्यामुळे त्यांना बदलत्या डिजिटल अर्थव्यवस्थेतील रोजगाराच्या संधींचा लाभ घेता येईल.”वेदांता ग्रुपच्या “ट्रान्सफॉर्मिंग कम्युनिटीज” या व्यापक ईएसजी दृष्टीकोनचा एक भाग म्हणून, वेदांता निकोने कुंकोलिम येथील युनायटेड हायस्कूलला, (सीईएस सोसायटीद्वारे व्यवस्थापित) 24 डेस्क आणि 48 बेंच उपलब्ध करून देऊन एका वर्गात आधुनिक सुविधांसह शिक्षणाचे वातावरण वाढवण्यासाठी मदत केली.वेदांता निको आपल्या सीएसआर उपक्रमांद्वारे शिक्षण, कौशल्य विकास आणि समुदाय उन्नतीसाठी काम करत राहून शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास साध्य करण्यासाठी कटिबद्ध आहे.