Home मनोरंजन कलाकार नवीन पंडिता, गरिमा परिहार, परिवा प्रणती आणि सुकन्या सुर्वे सांगत आहेत आपल्या आरोग्याला ते कसे अग्रक्रम देतात

कलाकार नवीन पंडिता, गरिमा परिहार, परिवा प्रणती आणि सुकन्या सुर्वे सांगत आहेत आपल्या आरोग्याला ते कसे अग्रक्रम देतात

11 second read
0
0
20

no images were found

कलाकार नवीन पंडिता, गरिमा परिहार, परिवा प्रणती आणि सुकन्या सुर्वे सांगत आहेत आपल्या आरोग्याला ते कसे अग्रक्रम देतात

नवीन पंडिता, गरिमा परिहार, परिवा प्रणती आणि सुकन्या सुर्वे या सोनी सबच्या प्रतिभावान कलाकारांनी अलीकडेच सांगितले की, अत्यंत धकाधकीचे शूटिंग शेड्यूल असूनही आपल्या आरोग्याला ते कशी प्राथमिकता देतात. सेटवर कामासाठी जाणारे तासन् तास आणि वैयक्तिक आरोग्य यांचे संतुलन साधणे हे एक आव्हानच असते. पण त्यातही शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी या कलाकारांनी आपापला मार्ग शोधून काढला आहे. आपल्या डाएट नियंत्रित करण्यापासून आणि झटपट वर्कआउट करण्यापासून ते ध्यान आणि सेल्फ-केअर रूटीन सांभाळण्यापर्यंत ते बरेच काही करतात कारण आपल्या आयुष्यातील निरोगी राहण्याचे महत्त्व त्यांनी जाणले आहे. खूप थकवून टाकणाऱ्या दिवसांतही सक्रिय आणि सकारात्मक राहण्यासाठी त्यांना मदत करणाऱ्या टिप्स कोणत्या आहेत, ते या कलाकारांकडूनच ऐका. खूप व्यस्त दिनचर्या असतानाही निरोगी जीवनशैली ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकासाठी या टिप्स प्रेरणादायक ठरतील.

‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत अश्विन पटेलची भूमिका करणारा नवीन पंडिता म्हणतो, “टीव्ही कलाकारांसाठी एक शिस्तबद्ध शेड्यूल सांभाळणे फार अवघड असते, कारण बऱ्याचदा आम्ही दिवसाला 12-14 तास काम करतो. निरोगी राहण्यासाठी माझे आहारकडे विशेष लक्ष असते आणि जेव्हा मला सुट्टी असते, त्या दिवशी कमीत कमी एक तास तरी मी वर्कआउट करतोच. जर ते शक्य नसेल, तर मी चालायला जातो आणि किती स्टेप्स होतात याकडे लक्ष ठेवतो. संतुलन सांभाळण्यासाठी दररोज 6000 ते 10000 स्टेप्स झाल्या पाहिजेत हे माझे लक्ष्य असते. स्वतःची निगा राखण्यासाठी इतर अभिनेत्यांप्रमाणे मी सुद्धा सकाळचे आणि रात्रीचे रूटीन नेमाने पाळतो.”

‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत काम करणारी गरिमा परिहार म्हणते, “माझ्यासाठी मानसिक आणि शारीरिक आरोग्य हातात हात घालूनच जाते. मानसिक स्वास्थ्यासाठी माझा भर मेडिटेशनवर असतो. खूप व्यस्त शेड्यूल असले, तरी मी त्यासाठी वेळ काढते. शारीरिक आरोग्यासाठी मी सेटवर बसून राहण्याऐवजी उभे राहणे आणि चालणे पसंत करते. सोबतीला आहाराकडेही लक्ष देते, कारण जिममध्ये नियमितपणे जाणे शक्य होत नाही. मी बाहेर जाते, तेव्हा शक्यतो स्पा सेशन करतेच कारण स्वतःच्या शरीराचे कोडकौतुक करायला मला आवडते आणि त्याचा मला फायदाही होतो.”

वागले की दुनिया’मध्ये वंदनाची भूमिका करणारी परिवा प्रणती म्हणते, “मानसिक आरोग्यासाठी मी नेहमी सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करते, मग कितीही जाचक शेड्यूल असो. शारीरिक आरोग्यासाठी जेव्हा जेव्हा शक्य असते तेव्हा मी सेटवर चालते आणि आहार देखील संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करते. दिवस कितीही धकाधकीचा असला, तरी सेल्फ-केअरचे मार्ग शोधावेच लागतात!”

शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठीचा आपला दृष्टिकोन शेअर करताना ‘वागले की दुनिया’ मालिकेत विद्या वागलेची भूमिका करणारी सुकन्या सुर्वे म्हणते, “दैनिक मालिकेत काम करताना एक नियमित दिनचर्या ठेवणे फारच कठीण असते. पण एक अभिनेत्री म्हणून देखील माझ्यासाठी ठणठणीत राहणे आवश्यक आहे, कारण लोक आमच्याकडे आदर्श म्हणून बघत असतात. दिवसभर शरीर तरतरीत राहावे यासाठी मी घरून निघण्याअगोदर काही तरी व्यायाम करते किंवा रात्री काम आटोपल्यावर तरी करते. मला वाटते, प्रत्येकाने शारीरिक कसरत करण्यासाठी रोज थोडा वेळ द्यायलाच हवा. मानसिक शांतीबद्दल मी म्हणेन की, प्रत्येक जण ही शांती मिळवण्यासाठी आपापला मार्ग शोधत असतो. काहींना संगीत ऐकून बरे वाटते, तर काही लोक पेंटिंग करतात. मी स्वतः एका आध्यात्मिक कुटुंबात राहात असल्याने मी माझ्या दिवसाच्या आरंभी माझ्या गुरूंचे नामस्मरण करते. ही गोष्ट मी कधीच चुकवत नाही, काहीही झाले तरी! माझ्यासाठी ती फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण त्यामुळे माझ्यात सकारात्मकता येते आणि ते माझ्यासाठी संरक्षक कवच म्हणूनही काम करते. मानसिक स्वास्थ्य सांभाळण्यासाठी आणि संतुलित जीवनशैलीसाठी मला त्याची मदत होते.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एचडीएफसी  बँकेने पटकावला ‘इंडियाज बेस्ट फॉर ‘एचएनडब्लू’ पुरस्कार

एचडीएफसी  बँकेने पटकावला ‘इंडियाज बेस्ट फॉर ‘एचएनडब्लू’ पुरस्कार   मुंबई,: युरोम…