यूडीएस फाउंडेशनकडून कोल्हापूरमध्ये मोबाईल मेडिकल क्लिनिकचा शुभारंभ कोल्हापूर,(प्रतिनिधी) : गरजू आणि वंचित नागरिकांपर्यंत प्राथमिक आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने यूडीएस फाउंडेशनतर्फे कोल्हापूरमध्ये मोबाईल मेडिकल क्लिनिकचा शुभारंभ करण्यात येणार आहे. “ब्रिजिंग द गॅप — प्रत्येक समुदायासाठी आरोग्यसेवा” या संकल्पनेखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या मोबाईल मेडिकल क्लिनिकद्वारे प्राथमिक आरोग्य तपासणी, डॉक्टरांचा सल्ला, आरोग्य जनजागृती, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन उपलब्ध करून …