Home Video जयघोष करत हिंदुत्वनिष्ठांचे दिल्लीकडे प्रस्थान ! 

जयघोष करत हिंदुत्वनिष्ठांचे दिल्लीकडे प्रस्थान ! 

10 second read
0
0
40

no images were found

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’साठी सनातन राष्ट्राचा जयघोष करत हिंदुत्वनिष्ठांचे दिल्लीकडे प्रस्थान ! 

कोल्हापूर (प्रतिनिधी) – ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाउंडेशन’ प्रस्तुत आणि ‘सनातन संस्थे’च्या आयोजनात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ हा भव्य सोहळा १३ आणि १४ डिसेंबर या दिवशी नवी दिल्लीतील ‘भारत मंडपम’ येथे आयोजित केला आहे. हा कार्यक्रम ‘सनातन संस्थे’च्या रौप्यमहोत्सवी वर्षातील एक विशेष पर्व असणार आहे. या महोत्सवासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून सनातन संस्थेचे साधक, हिंदू धर्म#प्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ आणि मान्यवर यांनी ‘सनातन राष्ट्रा’चा जयघोष करत रेल्वेतून, गाड्यांमधून, तसेच विमानातून दिल्लीकडे प्रयाण केले. या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी परिधान केलेल्या भगव्या टोप्या, तसेच वाहनांवर लावलेले भगवे ध्वज हे जनतेचे लक्ष वेधून घेत होते. या वेळी या महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. 

 

या महोत्सवासाठी असलेल्या प्रमुख उपस्थितांमध्ये तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. हरीश कुलकर्णी, उद्योजक श्री. जयंतीलाल पटेल, श्री. महादेव आढावकर, श्री. शरद शेटे, हिंदुत्वनिष्ठ श्री. रामभाऊ मेथे आणि श्री. शिवाजी शिनगारे, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री श्री. पंढरीनाथ ठाणेकर, राष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हा कार्याध्यक्ष  श्री. दत्ता पाटील, मंदिर महासंघाचे सर्वश्री अशोक गुरव, आप्पासाहेब गुरव, विलास पाटील, हिंदु महासभेचे श्री. विकास जाधव यांचा समावेश आहे. 

‘सव्यासाची गुरुकुलम्’ यांच्या दुर्मिळ शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन !

या भव्य महोत्सवात कोल्हापूर जिल्ह्यातील ‘सव्यासाची गुरुकुलम्’ यांच्या दुर्मिळ शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन लावण्यात येणार आहे. यात ढाल, तलवार, भाला, जांभिया, कट्यार यासंह अनेक दुर्मिळ शस्रे ठेवण्यात येणार आहेत. 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…