no images were found
भाजपा उत्तरेश्वर मंडल कडून दुधाळी परिसरातील रस्त्यासाठी ठिय्या आंदोलन
कोल्हापूर( प्रतिनिधी):दुधाळी परिसरातील उत्तरेश्वर पेठ व रंकाळा टॉवर परिसरास जोडणारा,यंगटायगर ते महाराणा प्रताप हायस्कुल पर्यंतच्या रस्तायची दुरावस्था झाली आहे तो रस्ता व तिथे असणाऱ्या पुलाचे नूतनीकरण करून रस्ता नव्याने करावा अशी भाजपा उत्तरेश्वर मंडल म्हणून वेळोवेळी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाला निवेदन देऊन मागणी केली होती. कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन म्हणून याची दखल घेतली गेली नाही.
म्हणून आज भाजपा उत्तरेश्वर मंडल व उत्तरेश्वर पेठेतील नागरिकांनी रास्तारोको आंदोलन करत कोल्हापूर महानगर पालिकेच्या प्रशासना विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या तसेच हा रस्ता लवकरात लवकर झाला नाही तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन आम्हाला करावे लागेल असा इशारा भाजपा उत्तरेश्वर मंडलचे अध्यक्ष सुनिल पाटील व विराज चिखलीकर यांनी ह्या वेळी दिला.
आंदोलन स्थळी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने जेई पठवेगार मॅडम उपस्थित झाल्या तेथील रस्त्याची वस्तुस्थिती दाखवण्यात आली. त्यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर त्यांनी रस्ता लवकरात लवकर पूर्ण करू असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी विराज चिखलीकर,सुनिल पाटील,भरत काळे सुशांत पाटील,राजु माने,हेमंत कांदेकर,दीपक काटकर,अमेय भालकर,अनिकेत अतिग्रे,नरेश जाधव, राहुल घाडगे, विश्वजीत पवार, वल्लभ देसाई,रोहित कारंडे, यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.