no images were found
जी एच रायसोनी स्मृती कोल्हापूर जिल्हा सतरा वर्षाखालील मुला मुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेत अथर्व तावरे व दिशा पाटील अजिंक्य
कोल्हापूर (प्रतिनिधी):- अयोध्या टॉवर, दाभोळकर कॉर्नर, कोल्हापूर येथे चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेल्या 17 वर्षाखालील मुला मुलींच्या कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाल्या. स्विस लीग पद्धतीने जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार स्विस् लीग पद्धतीने झालेल्या या स्पर्धेत अंतिम सहाव्या फेरीनंतर मुलांच्या गटात द्वितीय मानांकित इचलकरंजीच्या अथर्व तावरे ने गुण व 13 टायब्रेक गुणासह अजिंक्यपद पटकाविले. तर दहावा मानांकित कोल्हापूरचा सर्वेश पोतदारला साडेपाच गुण व बारा टायब्रेक गुणामुळे उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तृतीय मानांकित कोल्हापूरचा वेंकटेश खाडे पाटील, इचलकरंजीचा आदित्य कोळी व कोल्हापूरचा अर्णव पोर्लेकर या तिघांचे पाच गुण झाल्यामुळे टायब्रेक गुणानुसार त्यांचा अनुक्रमे तिसरा, चौथा व पाचवा क्रमांक आला. मुलींच्या गटात द्वितीय मानांकित जयसिंगपूरच्या दिशा पाटील ने साडेपाच गुणासह अजिंक्यपद मिळविले. अग्रमानांकित जयसिंगपूरच्या दिव्या पाटील पाच गुण मिळवून उपविजेती ठरली. जयसिंगपूरच्याच कर्वे ला साडेचार गुणासह तृतीय स्थान मिळाले. कोल्हापूरची हर्षदा सूर्यवंशी पाटील व नांदणीची संस्कृती सुतार या दोघी चार गुणासह अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानी राहिल्या.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ आयुर्विमा महामंडळाचे निवृत्त अधिकारी व बुद्धिबळपटू किरण शिंदे, बुद्धिबळपटू उमेश कांबळे, उद्योजक शिवराज सूर्यवंशी पाटील , प्रिया कुलकर्णी मॅडम व सोनम मुजावर मॅडम यांच्या शुभ हस्ते झाला यावेळी आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, उपाध्यक्ष धीरज वैद्य, कॅंडिडेट मास्टर अनिश गांधी, राष्ट्रीय पंच आरती मोदी व नंदकुमार वाली उपस्थित होते.
*उत्तेजनार्थ बक्षीस हे पुढील प्रमाणे*
*पंधरा वर्षाखालील उत्कृष्ट* आदित्य कोळी इचलकरंजी, संस्कृती सुतार नांदणी
*तेरा वर्षाखालील उत्कृष्ट* अर्णव पोर्लेकर कोल्हापूर, सृष्टी जोशीराव कोल्हापूर
*अकरा वर्षाखालील उत्कृष्ट* वन्शील ठक्कर कोल्हापूर, प्राप्ती चिखलीकर कोल्हापूर
*नऊ वर्षाखालील उत्कृष्ट* शिवांश सुतार कोल्हापूर, शिरीवा मगदूम इचलकरंजी
*सात वर्षाखालील उत्कृष्ट* अद्वैत कुलकर्णी कोल्हापूर, नक्षत्रा कांबळे कोल्हापूर
या स्पर्धेतून खालील दोन मुलांची व चार मुलींची निवड धुळे येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य 17 वर्षाखालील मुला मुलींची निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघात झाली आहे.
1) अथर्व तावरे इचलकरंजी 2) सर्वेश पोतदार कोल्हापूर
1) दिशा पाटील जयसिंगपूर 2) दिव्या पाटील जयसिंगपूर 3) सिद्धी कर्वे जयसिंगपूर 4) हर्षदा सूर्यवंशी पाटील कोल्हापूर