Home Uncategorized ग्राहकांच्या अभिप्रायातून Ai+ स्मार्टफोन च्या सेवा आणि उत्पादनांत सुधारणा

ग्राहकांच्या अभिप्रायातून Ai+ स्मार्टफोन च्या सेवा आणि उत्पादनांत सुधारणा

8 second read
0
0
6

no images were found

ग्राहकांच्या अभिप्रायातून Ai+ स्मार्टफोन च्या सेवा आणि उत्पादनांत सुधारणा

कोल्हापूर : ग्राहकांचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी Ai+ स्मार्टफोन ग्राहकांच्या अभिप्रायानुसार आपल्या उत्पादनांमध्ये आणि विक्रीपश्चात सेवांमध्ये सुधारणा करत आहे. कॅमेरा स्थिरता, कनेक्टिव्हिटी आणि परफॉर्मन्ससंबंधीच्या समस्यांवर उपाय करण्यासाठी कंपनी सॉफ्टवेअर अपडेट्स आणि उत्पादन चाचण्यांवर भर देत आहे.
Nova 2 Neo 5G च्या बॅटरी लाइफचे, Nova 2 Power 5G च्या आकर्षक डिझाइनचे, तर Nova 2 Ultra 5G च्या कॅमेरा आणि AMOLED डिस्प्लेचे ग्राहकांनी कौतुक केले आहे. कंपनीच्या ‘प्रोजेक्ट ओपन रिव्ह्यू’ उपक्रमासाठी परीक्षक, पत्रकार, क्रिएटर्स आणि तंत्रज्ञानप्रेमींकडून एक हजारांहून अधिक नोंदणी झाल्या आहेत.
ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण जलद करण्यासाठी कंपनीने ग्राहक सहाय्य आणि सोशल मीडिया तक्रार निवारण प्रक्रिया अधिक सक्षम केली आहे. बहुतांश सेवा तक्रारी तीन ते चार दिवसांत सोडवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
Ai+ स्मार्टफोन च्या ब्रँड, मार्केटिंग आणि ग्रोथ प्रमुख अर्चि गोगोई यांनी सांगितले की, ग्राहकांचा अभिप्राय उत्पादन सुधारणा आणि तत्पर सेवा देण्यासाठी महत्त्वाचा आहे. ग्राहकांच्या अनुभवातून शिकत अधिक विश्वासार्ह आणि सुलभ स्मार्टफोन अनुभव देण्यावर कंपनीचा भर आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

शिवाजी विद्यापीठात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात; ‘वंदे मातरम्’ पुस्तकाचे मूकवाचन

शिवाजी विद्यापीठात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात; ‘वंदे मातरम्’ पुस्…