Home Uncategorized ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये ‘तंबाखू मुक्त शाळा’ जनजागृती उपक्रम सपन्न…

‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये ‘तंबाखू मुक्त शाळा’ जनजागृती उपक्रम सपन्न…

1 second read
0
0
7

no images were found

‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये ‘तंबाखू मुक्त शाळा’ जनजागृती उपक्रम सपन्न…
कोल्हापूर:- सेवा संकल्प अभियानाअंतर्गत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम कोल्हापूर यांच्या वतीने “तंबाखू मुक्त शाळा” या विशेष उपक्रमाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांना भेटी देऊन जनजागृती करण्यात आली.

या उपक्रमांतर्गत जिल्हा सल्लागार (NTCP) डॉ. व्ही. ए. आरळेकर व त्यांच्या पथकाने करवीर तालुक्यातील वाळिवडे येथील डॉ. कु. मालती मोहनलाल दोशी हायस्कूल, छ. शिवाजी हायस्कूल, श्री गणेश विद्यालय (प्रयाग चिखली), हातकणंगले तालुक्यातील बालवधूत हायस्कूल (मौजे वडगाव), संभाजीराव माने ज्युनिअर कॉलेज (रुकडी) आणि पन्हाळा तालुक्यातील विद्यामंदिर (बोरपाडळे) या शैक्षणिक संस्थांना प्रत्यक्ष भेटी दिल्या.
भेटीदरम्यान डॉ. व्ही. ए. आरळेकर आणि त्यांच्या टीमने संबंधित शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांशी संवाद साधला. या प्रसंगी शाळा ‘तंबाखू मुक्त’ करण्यासाठी आवश्यक असणारे ९ निकष, १०० यार्ड (वार) परिसरातील तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी आणि शालेय तंबाखू नियमन समितीची रचना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
तसेच, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तंबाखू जन्य पदार्थाचे सेवन मुळे होणारे दुष्परिणाम,नियमित मुख आरोग्य तपासणी, योग्य पद्धतीने दात घासणे (ब्रशिंग) आणि सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहणे किती गरजेचे आहे, याविषयी जागरूक करण्यात आले.
या जनजागृती मोहिमे दरम्यान संबंधित शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, एनटीसीपी टीमचे सदस्य आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

शिवाजी विद्यापीठात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात; ‘वंदे मातरम्’ पुस्तकाचे मूकवाचन

शिवाजी विद्यापीठात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात; ‘वंदे मातरम्’ पुस्…