Home मनोरंजन एक घड्याळ… एक अदृश्य सावली… आणि मृत्यूचं गूढ! ‘मृत्यूचक्र’चं रहस्यमय मोशन पोस्टर प्रदर्शित…

एक घड्याळ… एक अदृश्य सावली… आणि मृत्यूचं गूढ! ‘मृत्यूचक्र’चं रहस्यमय मोशन पोस्टर प्रदर्शित…

2 second read
0
0
12

no images were found

एक घड्याळ… एक अदृश्य सावली… आणि मृत्यूचं गूढ!
‘मृत्यूचक्र’चं रहस्यमय मोशन पोस्टर प्रदर्शित…

कोल्हापूर:- मराठी सिनेसृष्टीत विविध विषय आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असताना आता एका रहस्यमय सस्पेन्स-थ्रिलरची उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘मृत्यूचक्र’ या आगामी मराठी चित्रपटाचं रहस्यमय मोशन पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं असून, पोस्टरने चित्रपटाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
श्री महादेव फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत आणि अध्यांश मोशन पिक्चर प्रोडक्शन्स निर्मित ‘मृत्यूचक्र’ या चित्रपटाची निर्मिती प्रणाली उन्मेश वाघमोडे यांनी केली आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन विलास वाघमोडे आणि अनुप्रिता कडु-गंगावणे यांनी केलं आहे.
‘प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली…’ या गूढ वाक्याने सुरू होणारं हे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करतं. पोस्टरमध्ये दिसणारं एक गूढ घड्याळ, त्यावरचे आकडे आणि त्याभोवती निर्माण झालेलं भयावह वातावरण चित्रपटाच्या रहस्याची झलक देतं.
या घड्याळाचं रहस्य काय?
ही अदृश्य सावली नेमकी कोणाची?
मृत्यूचं हे चक्र कुणाभोवती फिरणार?
या प्रश्नांची उत्तरं मात्र सध्या गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे ‘मृत्यूचक्र’च्या मोशन पोस्टरमधून चित्रपटाची कथा किंवा पात्रांबाबत कोणताही थेट खुलासा न करता केवळ उत्सुकता वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
गूढ वातावरण, रहस्यमय घड्याळ आणि ‘प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली…’ या टॅगलाईनमुळे ‘मृत्यूचक्र’ नेमकं कोणतं रहस्य उलगडणार, याची उत्सुकता आता वाढली आहे.
चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नसून, ‘लवकरच चित्रपटगृहांत’ असा उल्लेख मोशन पोस्टरवर करण्यात आला आहे. ‘मृत्यूचक्र’ लवकरच संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही रहस्यं सांगायची नसतात… ती उलगडण्याची वाट पाहायची असते! ‘मृत्यूचक्र’ — लवकरच चित्रपटगृहांत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

प्रतिसरकारचे शोषणमुक्त समाजाचे स्वप्न ‘जेन-झी’ने साकारावे: डॉ. भारत पाटणकर

प्रतिसरकारचे शोषणमुक्त समाजाचे स्वप्न ‘जेन-झी’ने साकारावे: डॉ. भारत पाटणकर कोल्हापूर,: स्व…