Home Uncategorized १५,००० सिमेंटच्या गोण्यांमधून साकारली आई दुर्गेची भव्य प्रतिमा : अदानी सिमेंटने आकाशातून उलगडले श्रद्धा आणि शक्तीचे अनोखे दर्शन

१५,००० सिमेंटच्या गोण्यांमधून साकारली आई दुर्गेची भव्य प्रतिमा : अदानी सिमेंटने आकाशातून उलगडले श्रद्धा आणि शक्तीचे अनोखे दर्शन

1 second read
0
0
8

no images were found

१५,००० सिमेंटच्या गोण्यांमधून साकारली आई दुर्गेची भव्य प्रतिमा : अदानी सिमेंटने आकाशातून उलगडले श्रद्धा आणि शक्तीचे अनोखे दर्शन

 नवरात्रोत्सव आणि दुर्गापूजा २०२६ च्या निमित्ताने अदाणी सिमेंटने आई दुर्गेला अनोख्या पद्धतीने अभिवादन केले आहे. अदाणी समूहाचा भाग असलेल्या आणि जगातील नवव्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या सिमेंट उत्पादक कंपनीने १५,००० सिमेंटच्या गोण्यांमधून आई दुर्गेची भव्य प्रतिमा साकारली आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबवणारी ही पहिली आणि एकमेव सिमेंट कंपनी आहे. मध्य प्रदेशातील कैमोर येथील प्लांटमध्ये ‘जहाँ विश्वास, वहाँ शक्ति’ या अभियानांतर्गत ही भव्य प्रतिमा साकारण्यात आली. यासाठी अंबुजा सिमेंट्स आणि एसीसीच्या १५,००० गोण्यांचा वापर करण्यात आला. या सर्व गोण्यांचे एकूण वजन ७५० टन होते. ७० × ७० फूट क्षेत्रफळात साकारलेल्या या विशाल प्रतिमेसाठी एकत्रितपणे १२,६०० तासांचे श्रमदान करण्यात आले.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे जमिनीवरून पाहिल्यास सिमेंटच्या हजारो गोण्या स्वतंत्रपणे दिसतात; मात्र कॅमेरा जसजसा आकाशाच्या दिशेने जातो, तसतसे आई दुर्गेचे भव्य स्वरूप स्पष्ट होऊ लागते. त्यांचा मुकुट, डोळे, दहा भुजा आणि संपूर्ण प्रतिमा सिमेंटच्या गोण्या अत्यंत अचूकपणे मांडून साकारण्यात आली आहे. या अनोख्या कलाकृतीचे दर्शन एका डिजिटल फिल्मच्या माध्यमातून घडवण्यात आले असून, कंपनीने ही फिल्म आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि सोशल मीडियावर शेअर केली आहे.अदाणी सिमेंटचे हे अभियान केवळ एक भव्य प्रतिमा साकारण्यापुरते मर्यादित नाही. यामागे कंपनीच्या दोन प्रमुख ब्रँड्सची ओळख आणि त्यांची मूलभूत मूल्ये जोडलेली आहेत.

‘विश्वास’ हा एसीसीच्या नऊ दशकांहून अधिक काळाच्या विश्वासार्ह परंपरेचे प्रतीक आहे, तर ‘शक्ती’ ही अंबुजा सिमेंट्सच्या मजबुतीच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. भारतीय परंपरेत आई दुर्गेला शक्ती आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते. याच भावनेला केंद्रस्थानी ठेवून अदाणी सिमेंटने बांधकाम साहित्याच्या माध्यमातून श्रद्धा, विश्वास आणि सामूहिक प्रयत्नांना एक अनोखे रूप दिले आहे.

घरे आणि देशाच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीत वापरल्या जाणाऱ्या सिमेंटच्या गोण्यांमधूनच आई दुर्गेची भव्य प्रतिमा साकारण्यात आली आहे. हजारो स्वतंत्र घटक आणि अनेकांच्या सामूहिक मेहनतीतून एका विशाल संकल्पाची पूर्तता कशी होऊ शकते, हे ही कलाकृती अधोरेखित करते.हे अभियान मध्य प्रदेशातील कैमोर आणि तेथील नागरिकांशी असलेल्या ऐतिहासिक नात्याचाही सन्मान करते. कैमोर येथे एसीसीचा सिमेंट प्लांट १९२३ मध्ये स्थापन करण्यात आला होता. या परिसरात रामलीलेच्या आयोजनाची दीर्घ परंपरा आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून अदाणी सिमेंटने स्थानिक परंपरा, श्रद्धा आणि समुदायाशी असलेले आपले नाते अधिक दृढ केले आहे.

या अभियानाची डिजिटल फिल्म एका विशेष संकल्पनेतून साकारण्यात आली आहे.फिल्मची सुरुवात जमिनीवरून होते. यामध्ये लोक सिमेंटच्या गोण्या एकामागोमाग एक ठरावीक जागी ठेवताना दिसतात. सुरुवातीला या हजारो गोण्यांमधून नेमके काय साकारले जात आहे, याचा अंदाज येत नाही. मात्र, कॅमेरा जसजसा वर जातो, तसतसे संपूर्ण दृश्य बदलू लागते. स्वतंत्रपणे मांडलेल्या १५,००० गोण्यांमधून हळूहळू आई दुर्गेची विशाल आणि प्रभावी प्रतिमा साकार झाल्याचे दिसते.हे दृश्य केवळ या कलाकृतीचा भव्य आकार अधोरेखित करत नाही, तर त्यामागील सामूहिक प्रयत्न, अचूक नियोजन आणि समर्पण यांचेही दर्शन घडवते.‘जहाँ विश्वास, वहाँ शक्ति’ या अभियानाच्या माध्यमातून अदाणी सिमेंटने एसीसीचा विश्वास आणि अंबुजा सिमेंट्सची मजबुती यांचा भारतीय श्रद्धा आणि परंपरेशी सुरेख संगम साधत आई दुर्गेप्रती आपला आदर आणि भक्तिभाव अनोख्या पद्धतीने व्यक्त केला आहे.”.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

शिवाजी विद्यापीठात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात; ‘वंदे मातरम्’ पुस्तकाचे मूकवाचन

शिवाजी विद्यापीठात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात; ‘वंदे मातरम्’ पुस्…