
no images were found
घटस्फोटाच्या चर्चेनंतर ऐश्वर्या राय कडून मोठा खुलासा!
बच्चन कुटुंबातील वाद सध्या चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोरात सुरु आहेत.अभिषेक आणि ऐश्वर्या प्रकरणात रोज नवनवीन माहिती हाती येत आहे. आताही अशीच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऐश्वर्यांने मोठा खुलासा केला आहे. काही वर्षांपूर्वी ऐश्वर्याने माध्यामांशी बोलत असताना एक खुलासा केला. ती म्हणाली की, अभिषेक आणि माझ्यात छोट्या छोट्या करणावरुन वाद होत होते. मात्र, नंतर अभिषेकने या मागचं कारण सांगितलं.
अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्यामध्ये वाद नव्हते तर ते मतभेद असायचे असं अभिषेक म्हणाला. पुढे तो म्हणाला की, आमच्यामध्ये भांडण होत नव्हतं तर हेल्थची चर्चा व्हायची कारण असं झालं नाही तर जीवन पूर्णपणे कंटाळवाणं होईल. ते भांडण कधीच गंभीर नव्हतं, असं देखील अभिषेक म्हणाला.
दरम्यान, या वेळी त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता. जर तुमच्यामध्ये मतभेद झाले तर तो कसा सोडवता? त्यावर ऐश्वर्या म्हणाली, “शक्यतो असं काही झालं तर तोच माफी मागतो.” त्यावर अभिषेक म्हणाला की, “पण आमचा नियम आहे, आम्ही भांडण करुन कधीच झोपत नाही असं”.
अभिषेकनं पुढे सांगितलं, “मी माफी मागण्याचे कारण हे अनेक वेळा असे सांगतो की, मला खूप झोप लागली आहे आणि झोपायला जायचं आहे. महिला नेहमीच महान असतात आणि त्या नेहमीच बरोबर असतात. पुरुष हे जितक्या लवकर स्वीकारतील तितकं चांगलं असतं.