Home Video रॉयलओक फर्निचरने कोल्हापुरात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय संग्रहासह आपले प्रमुख स्टोअर सुरू

रॉयलओक फर्निचरने कोल्हापुरात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय संग्रहासह आपले प्रमुख स्टोअर सुरू

30 second read
0
0
52

no images were found

रॉयलओक फर्निचरने कोल्हापुरात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय संग्रहासह आपले प्रमुख स्टोअर सुरू

कोल्हापूर,(प्रतिनिधी): भारतातील नंबर १ फर्निचर ब्रँड असलेल्या रॉयलओक फर्निचरने आपल्या उत्कृष्ट ‘कंट्री स्टोअर’ संग्रहाचे उद्घाटन करून कोल्हापूर, महाराष्ट्रात आपले ‘प्रमुख स्टोअर’ सुरू केले आहे.

या भव्य उद्घाटन सोहळ्याला खालील मान्यवरांची उपस्थिती लाभली, ज्यामुळे सोहळ्याची शोभा वाढली:

·       मा. श्री. शाहू छत्रपती महाराज जी, खासदार, कोल्हापूर

·       श्री. विजय सुब्रमण्यम, अध्यक्ष, रॉयलओक इन्कॉर्पोरेशन प्रा. लि.

·       श्री. भगीरथजी छाबडा, राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय सिंद्धू सभा आणि अध्यक्ष, सिंधी पंचायत धर्मशाळा, इचलकरंजी

·       श्री. अमरलालजी निरंकारी, क्षेत्रीय प्रभारी, कोल्हापूर – संत निरंकारी मिशन

·       श्री. रमेशभाई तनवाणी, उपाध्यक्ष, सिंधी समाज कोल्हापूर

·       आर्किटेक्ट संगीता भांबुरे, अध्यक्षा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स, कोल्हापूर केंद्र अभियंता

·       राजेंद्र खंडेराजूरी, अध्यक्ष, असोसिएशन ऑफ इंजिनियर्स अँड आर्किटेक्ट, इचलकरंजी

·       श्री. के.पी. खोत, अध्यक्ष, क्रेडाई, कोल्हापूर

      हा विस्तार रॉयलओकची कोल्हापूरच्या लोकांना दर्जेदार फर्निचर सोल्यूशन्स (प्रदान करण्याची प्रतिबद्धता दर्शवतो.या भव्य लाँच कार्यक्रमात रॉयलओक टीमचे सदस्य देखील उपस्थित होते, ज्यात खालील मान्यवर होते: श्री. किरण छाब्रिया, फ्रँचायझी प्रमुख, श्री. थम्मैय्या कोटेरा, प्रमुख – व्हिज्युअल मर्चेंडायझिंग आणि नवीन स्टोअर ओपनिंग, श्री. अजय शर्मा, प्रादेशिक प्रमुख – पश्चिम आणि उत्तर भारत आणि श्री. अजय दहाके, क्लस्टर व्यवस्थापक. यासोबतच फ्रँचायझी भागीदार असलेल्या लक्झेटा होम डेकॉर्स चे श्री. सचिन संजयकुमार नागदेव, श्री. विरेन भरत लखमानी आणि श्री. आदित्य भरत लखमानी हे देखील उपस्थित होते.

       या यशस्वी व्यवसायाच्या विस्तारामुळे, या ब्रँडने गेल्या काही वर्षांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत आणि अनेक विक्रेते व भागीदारांसह भविष्यातील व्यावसायिक विस्तारासाठी नवे मार्ग खुले केले आहेत.१५,००० चौरस फूट क्षेत्रफळ व्यापलेल्या या प्रभावी स्टोअरमध्ये घराच्या प्रत्येक भागासाठी फर्निचरचा विस्तृत आणि मोठा संग्रह उपलब्ध आहे, ज्यात लिव्हिंग रूम्स (बैठकीची खोली), बेडरूम्स, डायनिंग क्षेत्र, स्टडी आणि ऑफिस, आउटडोअर, होम डेकोर, मॅट्रेस (गाद्या) आणि बरेच काही समाविष्ट आहे. कोल्हापूरचे रहिवासी आता आपल्या परिसरातच किफायती दरात  उपलब्ध असलेले, स्टायलिश, स्मार्ट आणि उपयुक्त फर्निचरचे विविध प्रकार शोधू शकतात.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…