no images were found
‘यशाच्या वेळी साथ, अडचणीच्या वेळी वार?’ – निलेश राणेंची राजकीय भूमिका प्रश्नांकित
रायगड : (प्रतिनिधी) कुडाळ–मालवण परिसरात भाजपने राणे कुटुंबाला दिलेली साथ सर्वश्रुत आहे.
विधानसभा, लोकसभा, स्थानिक स्वराज्य संस्था — या सगळ्या स्तरांवर भाजपने राणेंना उभारी दिली.
संकटाच्या काळातही पक्षाने त्यांच्या मागे उभे राहण्याची राजकीय मोठेपणाची परंपरा कायम ठेवली.
मात्र आज परिस्थिती वेगळी आहे.
निलेश राणेंनी अचानक भाजपवर तुटून पडताना राजकीय विश्लेषकांनाही धक्का बसला आहे.
ज्यांच्या आधाराने राजकीय पुनरुज्जीवन झाले, त्यांच्याच विरोधात आज घातक वक्तव्ये — हे नैतिकतेला धरून नसल्याचे भाजपचे स्पष्ट म्हणणे आहे.
भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, “राणेंनी अनेक वेळा पक्षाचे आभार मानले होते, आणि अचानक अशी पलटी म्हणजे राजकीय बेभरवशाचे उदाहरण.”
स्थानिक मतदार सांगतात की राणेंच्या आजच्या आक्रमकतेत राजकीय असुरक्षितता अधिक, आणि तत्त्वनिष्ठा कमी दिसते.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेबरोबर सतत बदललेल्या समीकरणांचा इतिहास राणेंच्या राजकीय स्थैर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतो.
युतीधर्म, निष्ठा, आणि नेतृत्वाचा सन्मान — या सर्व मूल्यांना तिलांजली दिल्याची भावना पक्षात तीव्र झाली आहे.
भाजपचा टक्का स्पष्ट आहे —
“राजकारणात किमान स्थिरता हवी. प्रत्येक निवडणुकीपूर्वी नवा पक्ष, नवा आरोप, नवा मंच — हे लोकनिष्ठ राजकारण नाही.”
राणेंच्या अलीकडच्या वक्तव्यांमुळे भाजपचा रोष वाढला असून कार्यकर्त्यांमध्ये ‘विकास कोणाचा? विरोध कोणाचा?’ हा प्रश्न अधोरेखित झाला आहे.
‘क्षेत्रात काम कोण करतो?’ भाजपाकडून आकडेवारीसह प्रत्युत्तर
निलेश राणेंच्या आरोपांवर भाजपने आता आकडेवारीचा भडिमार सुरू केला आहे.
गेल्या पाच वर्षांत झालेल्या विकासकामांची यादी जाहीर करत पक्षाने “प्रत्यक्ष काम आणि नावाला विरोध” असा संदेश दिला.
भाजपच्या आकडेवारीत —
◾ १२ मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण
◾ १,१०० कोटींचे तटीय मार्ग सुधारणा
◾ टेलीमेडिसिन केंद्रांची स्थापना
◾ २,५०० घरांसाठी मंजूर अनुदान
◾ पाणीपुरवठा प्रकल्पांचे आधुनिकीकरण
या सर्व प्रकल्पांमध्ये राणेंचे योगदान नगण्य असल्याचे पक्ष अधोरेखित करतो.
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने कुडाळ–मालवणला मिळालेली विशेष विकास अनुदाने आजही मतदारांमध्ये लोकप्रिय आहेत.
स्थानिक पातळीवर भाजपा कार्यकर्त्यांनी गावागावात चालवलेले संपर्क–अभियानही जनतेच्या मनात चांगली छाप सोडून गेले आहे.