Home Video डीकेटीईच्या टेक्स्टाईल विभागातील तीन विद्यार्थ्यांची ट्रायडेंट कंपनीत १२ लाख पॅकेजवरती निवड

डीकेटीईच्या टेक्स्टाईल विभागातील तीन विद्यार्थ्यांची ट्रायडेंट कंपनीत १२ लाख पॅकेजवरती निवड

12 second read
0
0
16

no images were found

डीकेटीईच्या टेक्स्टाईल विभागातील तीन विद्यार्थ्यांची ट्रायडेंट कंपनीत १२ लाख पॅकेजवरती निवड

इचलकरंजी (प्रतिनिधी ):- येथील डीकेटीई संस्थेतील टेक्स्टाईल विभागातील तीन विद्यार्थ्यांची आंतराष्ट्रीय ट्रायडेंट ग्रुप या नामांकित कंपनीमध्ये रु. १२ लाख इतक्या आकर्षक पॅकेजवरती निवड झाली आहे.
ट्रायडेंट ग्रुप ही सुमारे १ अब्ज अमेरिकन डॉलर्स उलाढाल असलेली भारतातील अग्रगण्य होम टेक्सटाईल कंपनी असून, तिची उत्पादने ७५ हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जातात. ही कंपनी टेरी टॉवेल व शिटींग फॅबरीक उत्पादन करते. उच्च दर्जाचे उत्पादन, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक बाजारपेठेतील भक्कम उपस्थितीमुळे ट्रायडेंट ग्रुपला वस्त्रोद्योग क्षेत्रात ब्रँड नावाने ओळख आहे.
या कंपनीने नुकतीच डीकेटीईस भेट दिली व २८ विद्यार्थ्यांना ऑनलाईन टेस्टसाठी शॉर्टलिस्ट केले होते यामधून १० विद्यार्थ्यांची सायकोमेट्रीक टेस्टसाठी निवड केली त्यानंतर टेक्नीकल व एचआरनी मुलाखात घेवून ३ विद्यार्थ्यांची ट्रायडेंट ग्रुपने १२ लाख पॅकेजवरती सुमिरन पांडे, श्रीकांत धुळे व श्रुती गौड यांची निवड केली आहे.
उदयोगविश्‍वाच्या अपेक्षांनुसार विद्यार्थ्यांना अ‍ॅप्टीटयूड टेस्ट, सॉफट स्किल्स, तांत्रिक ज्ञान आणि मुलाखात कौशल्यांचे प्रभावी प्रशिक्षण डीकेटीईमध्ये दिले जाते. या उदयोगाभिमुख प्रभावी प्रशिक्षणाचा परिणाम म्हणून देशातील अग्रगण्य कंपनीत निवड केली असून, गुणवत्तापूर्ण प्लेसमेंटची परंपरा डीकेटीईने पुन्हा एकदा कायम राखली आहे.
याचबरोबर तृतीय वर्ष टेक्स्टाईल विभागातील शुभम आलासे व सुखदा गणोकर या दोन विद्यार्थ्यांची रुपये ५० हजार इतक्या विद्यावेतनावर २ महिन्यासाठी समर इंटरनशिपसाठी निवड झाली आहे. ट्रायडेंटमध्ये डीकेटीईचे तृतीय वर्षातील विद्यार्थी संशोधक प्रकल्पावर काम करीत असून कंपनीच्या वतीने विविध विभागातील तज्ञ सदर विद्यार्थ्यांना या काळात मार्गदर्शन मिळत आहे. याशिवाय प्रशिक्षण कालावधीत विद्यार्थ्यांचे कार्यक्षमता व त्यांच्यातील संशोधन वृत्तीची पडताळणी करुण त्यांना थेट नोकरीसाठी घेण्याचे संकेत दिले आहेत.
सदर विद्यार्थ्यांस संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ.सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्‍वस्त यांनी शुभेच्छा दिल्या तर संचालिका प्रा.डॉ.सौ.एल.एस. आडमुठे,उपसंचालक डॉ. यु. जे. पाटील, ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट ऑफीसर प्रा.एस.बी. अकिवाटे याचे मार्गदर्शन लाभले आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच्या:७२ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच्या:७२ विद्यार्थ्यांची नामा…