Home Uncategorized डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला ‘अधिकार प्रदत्त स्वायत्त महाविद्यालय’ दर्जा

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला ‘अधिकार प्रदत्त स्वायत्त महाविद्यालय’ दर्जा

4 second read
0
0
6

no images were found

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला ‘अधिकार प्रदत्त स्वायत्त महाविद्यालय’ दर्जा : पदवी प्रमाणपत्रावर आता महाविद्यालयाचेही नाव

कोल्हापूर (प्रतिनिधी):- कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या संस्थेला शिवाजी विद्यापीठाने ‘अधिकार प्रदत्त स्वायत्त महाविद्यालय’ (Empowered Autonomous Status) हा दर्जा प्रदान केला आहे.

या मान्यतेमुळे महाविद्यालयाला अभ्यासक्रम रचना, कौशल्याधारित शिक्षण, मूल्यमापन पद्धती, संशोधन, उद्योग-सहभाग आणि विद्यार्थीकेंद्रित शैक्षणिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचे विस्तारित अधिकार प्राप्त झाले आहेत. त्याचबरोबर पदवी प्रमाणपत्रावर आता शिवाजी विद्यापीठाबरोबरच महाविद्यालयाचेही नाव नमूद केले जाणार आहे. त्यामुळे जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याच्या दिशेने महाविद्यालयाची वाटचाल अधिक वेगाने होणार आहे.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी या यशाबद्दल अतिशय आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, हा दर्जा म्हणजे संस्थेने गेल्या चार दशकांहून अधिक काळ जपलेल्या शैक्षणिक उत्कृष्टतेचा आणि गुणवत्तेच्या सातत्यपूर्ण ध्यासाचा सन्मान आहे. विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनविण्यासाठी उद्योगाभिमुख, संशोधनाधारित आणि नावीन्यपूर्ण शिक्षण देण्याची आमची बांधिलकी यामुळे अधिक बळकट झाली आहे.

संस्थेचे विश्वस्त ऋतुराज पाटील म्हणाले, “विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञान, उद्योग आणि जागतिक गरजांशी सुसंगत शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा मैलाचा दगड आहे. या अधिकार प्रदत्त स्वायत्त दर्जामुळे शैक्षणिक निर्णय अधिक गतिमान होतील आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल.

कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले, अधिकार प्रदत्त स्वायत्त दर्जामुळे महाविद्यालयाला राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने आधुनिक अभ्यासक्रम, आंतरविद्याशाखीय शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि उद्योग-संलग्न उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविता येतील. गुणवत्तेच्या सर्वोच्च निकषांची पूर्तता करत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यासाठी आम्ही अधिक जोमाने कार्य करू.

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी १९८४ मध्ये स्थापन केलेल्या या महाविद्यालयाने गेल्या ४२ वर्षांत हजारो गुणवंत अभियंते घडविले आहेत. महाविद्यालयाला २०२० मध्ये स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा प्राप्त झाला असून २०२६ मध्ये एनबीए वॉशिंग्टन अकॉर्ड मानांकनही प्राप्त झाले आहे. त्यानंतर आता शिवाजी विद्यापीठाने २१ जुलै २०२६ रोजीच्या पत्राद्वारे महाविद्यालयाला ‘अधिकार प्रदत्त स्वायत्त महाविद्यालय’ हा विशेष दर्जा बहाल केला आहे.

या ऐतिहासिक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे यांनी सर्व सहकारी, कर्मचारी, आजी- माजी विद्यार्थी यांचे अभिनंदन केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

कोल्हापूरच्या क्रीडा इतिहासातील ऐतिहासिक निर्णय : आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी केडीसीएला १२.७६ हेक्टर जागा सुपूर्द

कोल्हापूरच्या क्रीडा इतिहासातील ऐतिहासिक निर्णय : आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी केडीस…