no images were found
स्कोडा ऑटो इंडियाकडून स्लाव्हिया मोंटे कार्लोसाठी दोन नवीन ड्युअल-टोन रंग पर्याय : शिमला ग्रीन आणि स्टील ग्रे रंगांमध्ये लिमिटेड एडिशन; केवळ २०० युनिट्स उपलब्ध
कोल्हापूर, : स्कोडा ऑटो इंडियाने आपल्या लोकप्रिय स्लाव्हिया मोंटे कार्लो सेडानसाठी दोन नवीन ड्युअल-टोन रंग पर्याय – शिमला ग्रीन आणि स्टील ग्रे – सादर केले आहेत. हे दोन्ही रंग मर्यादित स्वरूपात उपलब्ध असून, देशभरात केवळ २०० युनिट्सच विक्रीसाठी आणण्यात आल्या आहेत. हे मॉडेल १.० एटी आणि १.५ डीएसजी या व्हेरियंट्समध्ये उपलब्ध असेल.
नवीन रंग पर्यायांमुळे स्लाव्हिया मोंटे कार्लोचे स्पोर्टी आणि प्रीमियम व्यक्तिमत्त्व अधिक उठून दिसते. रॅली मोंटे कार्लोच्या प्रेरणेवर आधारित हे मॉडेल स्टायलिश डिझाइन, दमदार परफॉर्मन्स आणि आधुनिक फीचर्सचा संगम ग्राहकांना देते.
स्लाव्हिया मोंटे कार्लोमध्ये ब्लॅक्ड-आऊट एक्सटेरियर, सिग्नेचर मोंटे कार्लो स्टायलिंग, ब्लॅक-रेड प्रीमियम इंटिरियर, आधुनिक फीचर्स आणि आरामदायी केबिन देण्यात आली आहे. याशिवाय, स्कोडाच्या विश्वासार्ह टीएसआय इंजिनसह उत्कृष्ट ड्रायव्हिंग अनुभव आणि कार्यक्षमतेचा मिलाफ या मॉडेलमध्ये कायम ठेवण्यात आला आहे.
नवीन शिमला ग्रीन आणि स्टील ग्रे ड्युअल-टोन पर्यायांमुळे स्लाव्हिया मोंटे कार्लो अधिक आकर्षक बनली असून, प्रीमियम सेडान खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक खास पर्याय ठरणार आहे.