no images were found
दिवंगत अजित पवार यांच्या स्मृतीस अभिवादन. कोल्हापूर (प्रतिनिधी):-आज, दि.२२ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मार्केट यार्ड, कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार व लेखक डॉ. उत्तम चोरमारे यांनी अजितदादांच्या सहवासातील संस्मरणीय आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचा भावपूर्ण आढावा उपस्थितांसमोर मांडला.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा.ना. हसन मुश्रीफ, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.शिल्पा खोत, गोकुळचे मा.संचालक बाळासाहेब खाडे, मार्केट कमिटी संचालक भारत पाटील भुयेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, शहराध्यक्ष आदिल फरास, शिक्षण प्रसारक चेअरमन दिगंबर मेडसिंगे, जिल्हा परिषद सदस्य क्रांतिसिंह पवार-पाटील, करवीर पंचायत समितीचे सभापती साताप्पा पाटील, तसेच विलास भोसले, निवास पाटील, आशाताई पाटील, आनंदराव शिरोलीकर, प्रवीण पाटील, सूर्यकांत दिंडे, संदीप पाटील, कृष्णात धोत्रे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्व. अजितदादांच्या कार्याचा आदर्श आणि जनसेवेची प्रेरणा सदैव मार्गदर्शक राहो, हीच विनम्र श्रद्धांजली.