Home मनोरंजन एक विक्षिप्त डिटेक्टिव्ह, एक कोड्यात टाकणारा मृत्यू- आत्महत्या की खून? सोनी सबवर एकेन बाबूचे धडाक्यात पदार्पण  

एक विक्षिप्त डिटेक्टिव्ह, एक कोड्यात टाकणारा मृत्यू- आत्महत्या की खून? सोनी सबवर एकेन बाबूचे धडाक्यात पदार्पण  

9 second read
0
0
30

no images were found

एक विक्षिप्त डिटेक्टिव्ह, एक कोड्यात टाकणारा मृत्यू- आत्महत्या की खून? सोनी सबवर एकेन बाबूचे धडाक्यात पदार्पण

 

सोनी सबवर 24 नोव्हेंबर पासून बहुप्रतीक्षित डिटेक्टिव्ह कॉमेडी मालिका ‘एकेन बाबू’ सुरू झाली आहे. ही मालिका बंगालच्या लाडक्या, विनम्र गुप्तहेर एकेन्द्र सेन (अनिर्बन चक्रवर्ती) ची कहाणी हिंदी टेलिव्हिजनवर घेऊन येते. आठ वेब सीझन आणि तीन चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मन जिंकणारा हा विक्षिप्त, खवैय्या डिटेक्टिव्ह आता आपले खास चातुर्य, सूक्ष्म निरीक्षण आणि प्रकरण सोडवण्याची अनोखी शैली घेऊन टेलिव्हिजनवर आला आहे. गुन्ह्याचा शोध घेणाऱ्या गंभीर स्वरूपाच्या डिटेक्टिव्ह्जपेक्षा अगदी वेगळा असा एकेन बाबू अगदी साधासुधा माणूस आहे. त्यामुळे गुन्ह्याचा शोध घेण्याच्या त्याच्या असामान्य पद्धती आणखीनच  मोहक वाटतात.

 

प्रारंभिक एपिसोड्समध्ये बेंगलुरू हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये एकेन बाबूचे विचित्र पद्धतीने झालेले आगमन लवकरच गंभीर स्वरूप घेते, जेव्हा तेथील एक रहिवासी किरीट पटेल मृत अवस्थेत सापडतो आणि पोलीस ती आत्महत्या असल्याचे घोषित करतात. पण एकेनला काहीतरी वेगळेच जाणवते. गुन्ह्याची जागा तो तपासतो, तेथील रहिवाशांना काही प्रश्न विचारतो, एका गूढ ज्योतिषाचा सल्ला घेतो आणि पटेलची अनेक गुपितांनी भरलेली डायरी शोधतो. यानंतर त्याच्या मनातील शंका आणखी प्रबळ होते. एक एक तुकडा जोडत त्याचा शोध सुरू होतो आणि त्यातून तो खून असल्याचे त्याच्या लक्षात येते. मग मुख्य प्रश्न उद्भवतो, जर पटेलने स्वतःला मारले नाही, तर मग कुणी मारले?

 

एकेन बाबूची भूमिका करणारा अनिर्बन चक्रवर्ती म्हणतो, “या कथानकातील रोमांचक बाब ही आहे की, एकेन बाबू अशा प्रकरणात घुसला आहे, जी आत्महत्या असल्याचे सगळ्यांनी आधीच मानले आहे. पण जे दिसते आहे, ते त्याच्या बुद्धीला पटत नाही. छोट्या छोट्या विसंगती त्याच्या नजरेत येतात, सामान्य लोकांना जाणवणार देखील नाहीत असे तपशील तो टिपतो. आणि हीच तर त्याची ताकद आहे. या परिस्थितीत एकेनची भूमिका करणे फारच थरारक आहे, कारण तुम्ही बघाल तर त्याची सहजप्रेरणा जागी होते, कुतूहल आणखी वाढते, धारणा पक्की होत जाते, आणि मगच तो इतरांची मान्यता खोडून काढण्यास सज्ज होतो. ही एकेन बाबूची खासियत आहे. इतर कोणाचाही विश्वास नसला, तरी तो आपल्या निरीक्षणावर विश्वास ठेवतो.”

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…