Home स्पोर्ट्स १६ राज्यांतील १७८ Gen Z स्पर्धक चिन्मया गीताचांति राष्ट्रीय अंतिम फेरीत

१६ राज्यांतील १७८ Gen Z स्पर्धक चिन्मया गीताचांति राष्ट्रीय अंतिम फेरीत

2 second read
0
0
40

no images were found

१६ राज्यांतील १७८ Gen Z स्पर्धक चिन्मया गीताचांति राष्ट्रीय अंतिम फेरीत

पुणे,  : चिन्मया मिशनचे जागतिक मार्गदर्शक स्वामी स्वरूपानंद यांच्या उपस्थितीत भारतातील १६ राज्यांतील १७८ राज्यस्तरीय विजेते २९–३० नोव्हेंबर रोजी चिन्मया विभूती (पुणे) येथे राष्ट्रीय गीताचांति स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी एकत्र आले. पुढील वर्षी होणाऱ्या चिन्मया अमृत महोत्सवाचा हा एक प्रमुख उपक्रम आहे.

१९८० च्या दशकात स्वामी चिन्मयानंदांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचा उद्देश “चँट–स्टडी–नो–लिव्ह” या तत्त्वावर आधारित गीतेचा संदेश मुलांपर्यंत पोहोचवणे हा आहे. यंदा १६ राज्यांतील २,५०० शाळांमधील तीन लाख विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. सहा गटांत घेण्यात आलेल्या स्पर्धेत दिव्यांग मुलांचाही समावेश होता.

परीक्षक म्हणून चिन्मया मिशनचे स्वामी व ब्रह्मचारिणी सहभागी झाले. अंतिम फेरी १५ व्या अध्यायावर — पुरुषोत्तम योग — आधारित होती. मुलांनी स्पर्धेसह चिन्मया विभूतीतील विविध आध्यात्मिक स्थळांना भेट दिली; पालकांनी ध्यान-चिंतन सत्रांचा अनुभव घेतला.

विजेत्यांचा सत्कार करताना स्वामी स्वरूपानंद म्हणाले, “खरा विजय बक्षीसात नसून गीतेशी सुरू झालेल्या आयुष्यभराच्या नात्यात आहे.” गीता जयंतीपूर्वसंध्येला स्वामी स्वरूपानंदांनी ‘गीता पंचामृत’ उपक्रमाचे उद्घाटन केले — गीतेतील निवडक पाच श्लोक सर्वांसाठी सोप्या रीतीने आत्मसात करण्याची ही नवी संकल्पना आहे. सेंट्रल चिन्मया मिशन ट्रस्टच्या सीईओ मनीषा खे्मलानी यांनी सांगितले की, २०२६ मधील स्पर्धा १२व्या अध्यायावर आधारित असेल, तर डिसेंबर २०२६ मध्ये आंतरराष्ट्रीय अंतिम फेरीत १२ हून अधिक देशांतील स्पर्धक सहभागी होतील.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…