आगामी लपंडाव मालिकेत अभिनेता चेतन वडनेरे दिसणार ड्रायव्हरच्या भूमिकेत? स्टार प्रवाहच्या ठिपक्यांची रांगोळी मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता चेतन वडनेरे एका छोट्या ब्रेकनंतर प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झालाय. स्टार प्रवाहवर लवकरच सुरु होणाऱ्या लपंडाव मालिकेत चेतन चक्क ड्रायव्हरच्या रुपात दिसणार आहे. याआधी ठिपक्यांची रांगोळी मालिकेत त्याने साकारलेलं शशांक हे पात्र खूप संयमित आणि शिस्तबद्ध होतं. लपंडाव मालिकेत तो साकारत असलेली कान्हा …