Home मनोरंजन ‘इत्ती सी खुशी’ मालिकेत रजत वर्माचा नवा लुक ‘मोहब्बतें’च्या शाहरुख खानसारखा आहे

‘इत्ती सी खुशी’ मालिकेत रजत वर्माचा नवा लुक ‘मोहब्बतें’च्या शाहरुख खानसारखा आहे

8 second read
0
0
26

no images were found

‘इत्ती सी खुशी’ मालिकेत रजत वर्माचा नवा लुक ‘मोहब्बतें’च्या शाहरुख खानसारखा आहे

 मुंबई, : वेधक कथानकामुळे सोनी सबवरील ‘इत्ती सी खुशी’ मालिका लोकप्रिय झाली आहे. या मालिकेत विराटची भूमिका करणाऱ्या रजत वर्माने अलीकडेच आपल्या लुकमध्ये लक्षणीय बदल घडवून आणला आहे, ज्यामुळे पडद्यावरील त्याच्या व्यक्तिरेखेला एक नवा कोरा आयाम मिळाला आहे. मालिकेत सुरुवातीला साध्या कॅज्यूअल्समध्ये बिनधास्त वाटणारा विराट आता नव्या लुकमध्ये अधिक परिपक्व आणि मर्दानी दिसत आहे.

    विराटची व्यक्तिरेखा अनुभव आणि जबाबदाऱ्यांमधून तावून सुलाखून प्रगल्भ झाली आहे. आता विराटचे स्टाइलिंग देखील बदलले आहे. क्लीन कट, सौम्य स्वर आणि नीटनेटके कपडे यामधून त्याच्यातील परिपक्वता स्पष्ट होते. गंमत म्हणजे, विराटच्या या लुकची प्रेरणा शाहरुख खानच्या ‘मोहब्बतें’ मधल्या लुकवरून मिळाली आहे.विराटचे बदललेले व्यक्तिमत्व दाखवण्यासाठी स्टाइलिंग टीमने SRK ची या चित्रपटातील सौम्य शालीनता, मिनिमल तरीही प्रभावी, शांत पण आत्मविश्वासपूर्ण लुक विराटला देण्याचा प्रयत्न केला आहे. सौम्य कापडापासून ते फिकट रंगांच्या कपड्यांपर्यंत प्रत्येक स्टाइलिंगमधून विराट सध्या ज्या टप्प्यातून जात आहे, त्याची कल्पना येते. तो सध्या गंभीर जबाबदारी सांभाळत आहे आणि कठीण परिस्थितीला तोंड देत आहे. त्याच्या तारुण्य-सुलभ लुक बदलून आता तो अधिक शांत आणि स्थिर दिसू लागला आहे. यामधून दिसते की विराटचा भावनिक विकास कसा झाला आहे आणि तो किती परिपक्व झाला आहे.

      या नवीन लुकविषयी बोलताना रजत वर्मा म्हणतो, “मी जेव्हा सुरुवातीला विराटची भूमिका करू लागलो, तेव्हा त्याच्या कपड्यांमधून हा अंदाज येत असे की, त्यावेळी तो कशा स्वभावाचा तरुण असेल- स्वच्छंद, काहीसा उतावळा आणि त्या क्षणात जगणारा. जसजशी ही व्यक्तिरेखा मोठी होत गेली आणि कथानक पुढे सरकले, त्यांचे स्टाइलिंगही स्वाभाविकपणे त्याच्या स्वभावानुसार अधिक सफाईदार आणिपरिपक्व झाले आहे. टीमने जेव्हा या परिवर्तनाविषयी चर्चा केली, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर पहिल्यांदा आला तो ‘मोहब्बतें’मधला शाहरुख खानचा लुक.या नवीन स्टाइलिंगमुळे लुकमध्ये एक विशिष्ट गांभीर्य आले. या लुकमुळे मला विराटची ही बदललेली, अधिक प्रगल्भ बाजू दाखवायला मदत झाली.त्याच्या या स्वभावाचा शोध घेताना मला आनंद मिळाला. आणि मला वाटते की, प्रेक्षकांनाही विराटमधले हे परिवर्तन जाणवेल.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण        &n…