no images were found
‘इत्ती सी खुशी’ मालिकेत अन्विता विराटला अपमानित करून संजयची बाजू घेते
सोनी सबवरील ‘इत्ती सी खुशी’ मालिकेत अन्विता (सुंबुल तौकीर खान)ची गोष्ट सांगितली आहे. अन्विता आता केवळ जगण्याचा नाही, तर स्वतःच्या जीवनाचा विचार करू लागली आहे. संजय (ऋषी सक्सेना) च्या मनातील वाढती असुरक्षितता आणि विराटच्या (रजत वर्मा) वागण्याचा उलगडा होत नसल्याने तिची स्थिती गोंधळलेली आहे. त्यातच रजतचे वडील राजनाथ वर्मा (फारूख सईद) यांच्या आग्रही स्वभावामुळे गुंतागुंत आणखी वाढली आहे. अन्वितावर निवड करण्याची पाळी आली आहे आणि त्यात तिच्या सक्षमतेची आणि नात्यांची परीक्षा होणार आहे.
पुढील कथानकात विराटचे माता-पिता त्यांच्या घरी, संजयच्या वरिष्ठाचा म्हणजे कमिश्नरचा सत्कार करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करतात. स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि आपल्या वडिलांसमोर स्वतःची पात्रता दाखवण्यासाठी विराट सुहास निवासमधील सर्वांना आपल्या रॉबिन हूड मित्रांसोबत आमंत्रित करतो. दरम्यान, कमिश्नर संजय आणि त्याच्या कुटुंबाला देखील ते आमंत्रण पाठवतो, जे अन्विताला माहीत नसते. आपल्या बॉसला खुश ठेवण्यासाठी संजय ही माहिती अन्वितापासून लपवतो आणि हे सुनिश्चित करतो की अन्विता त्याच्या सोबतच पार्टीत येईल. पार्टीची सुरुवात आनंदात होते, पण मग भलताच गोंधळ होतो. संजय जाणूनबुजून विराटला चिथवतो. त्यावरून त्यांच्यात बोलाचाली होते आणि सगळ्यांसमोर हा वाद विकोपाला जातो. विराटला अन्विताच्या आधाराची अपेक्षा असते, पण संजयची बाजू घेऊन ती सगळ्यांना धक्का देते, विराटला त्यांच्या आयुष्यापासून लांब राहायला सांगते.
या धक्क्याचा प्रतिसाद विराट कसा देईल? संजयची चूक समजून देखील अन्विता त्याची बाजू घेते, यामुळे विराट विचारात पडला आहे. तो अन्विताला तिच्या निष्ठेबद्दल विचारेल का? की हा त्यांच्या नात्यातील टर्निंग पॉइंट ठरेल?
विराटची भूमिका करणारा रजत वर्मा म्हणतो, “विराटसाठी हा एक टर्निंग पॉइंट आहे. संजय चुकीचा आहे हे माहीत असूनही अन्विताने त्याची बाजू घेतल्याने तो दुखावला आहे. एक अभिनेता म्हणून विराटचे ते दुखावलेपण, त्याचा राग आणि दुबळेपणा दाखवणे आव्हानात्मक आहे, पण तितकेच समाधान देणारेही आहे. कारण या अशा भावना आहेत, ज्या प्रत्येकाला जीवनाच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर अनुभवास येतातच. मला वाटते त्याच्या जीवनातील हा टप्पा लोकांना आपलासा वाटेल. कारण यात दाखवले आहे की, सशक्त आणि आत्मविश्वास असणाले लोक देखील त्यांचा विश्वास हलला की दुबळी आणि सैरभैर होतात.”