Home मनोरंजन ‘हुई गुम यादें’ मालिकेत इकबाल खान 8 वर्षांची स्मृती हरवलेल्या डॉ. देव च्या रूपात दिसणार

‘हुई गुम यादें’ मालिकेत इकबाल खान 8 वर्षांची स्मृती हरवलेल्या डॉ. देव च्या रूपात दिसणार

8 second read
0
0
24

no images were found

‘हुई गुम यादें’ मालिकेत इकबाल खान 8 वर्षांची स्मृती हरवलेल्या डॉ. देव च्या रूपात दिसणार

 भारताची आघाडीची हिंदी जनरल एन्टरटेन्मेंट चॅनल सोनी सब घेऊन येत आहे एक भावनात्मक, मेडिकल मालिका- ‘हुई गुम यादें – एक डॉक्टर, दो जिंदगियां’. जगातील अनेक देशांमधील वेगवेगळ्या भाषांमध्ये रूपांतरित झालेल्या आणि जगभरात वाखणल्या गेलेल्या डीओसी या इटालियन मेडिकल ड्रामाचे हे भारतीय रूपांतर आहे.या मालिकेत अभिनेता इकबाल खान डॉ. देव मेहता या मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. डॉ. देव मेहता अत्यंत प्रतिष्ठित आणि कुशल डॉक्टर आहे आणि त्यांचे वैद्यकीय कौशल्य आणि जीव वाचवण्यासाठीची अढळ वचनबद्धता याबद्दल तो प्रसिद्ध आहे. एका अनपेक्षित अपघातामुळे त्याला स्मृतिभ्रंश होतो आणि त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील 8 वर्षे पुसली जातात. तो एक डॉक्टर आणि एक व्यक्ती म्हणून आपली ओळख, नाती आणि कारकीर्द पुन्हा उभी करण्याचा प्रयत्न करत आहे. स्मृती आणि ओळख हरवल्यानंतर तो रुग्णांकडे केवळ डॉक्टर म्हणून नाही, तर एक माणूस म्हणून अधिक सहानुभूतीने आणि मानवी नात्याने पाहू लागला आहे. त्याला दुसरे जीवन मिळाल्यानंतर वैद्यक शास्त्राकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन बदलून गेला आहे आणि त्याने हे जाणले आहे की, रोगमुक्त होण्यासाठी केवळ वैद्यकीय कौशल्य नाही, तर करुणा आणि माणुसकीचा स्पर्श देखील आवश्यक असतो.

     ही मालिका आणि आपल्या भूमिकेविषयी बोलताना इकबाल खान म्हणतो, “यादें ही मुळात दुसऱ्या संधीविषयीची गोष्ट आहे. मी साकारत असलेल्या डॉ. देवने स्मृती गमावली आहे. त्याबरोबर अधिकार आणि त्याच्या परिचयाचे असलेले जीवनही गमावले आहे. पण या हानीमध्ये देखील पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची दुर्मिळ संधी त्याला मिळाली आहे. स्वतःला पुन्हा घडवत असताना तो अधिक ऐकायला शिकतो, अधिक अनुभवायला शिकतो आणि आपल्या रुग्णांशी केवळ डॉक्टर म्हणून नाही तर माणुसकीच्या नात्याने कनेक्ट व्हायला शिकतो. मला या कथानकातील ही कल्पनाच फार आवडली की, कधीकधी जीवन तुमच्याकडून सारे काही हिरावून घेते, पण त्यामुळे तुम्हाला सहानुभूती, विनम्रतेचे मोल समजते आणि तुम्ही हिंमतीने नवी सुरुवात करू शकता. डॉ. देवचा प्रवास हा आंतरिक बदलाचा प्रवास आहे.”हुई गुम यादें – एक डॉक्टर, दो जिंदगियां ही वैद्यक शास्त्र आणि माणुसकी यांचा संयोग घडवणारी एक हृदयस्पर्शी कथा असणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…