Home मनोरंजन मुरांबा मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरुची अडारकरची होणार एण्ट्री : रमा-अक्षयच्या नात्यात येणार नवं वळण

मुरांबा मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरुची अडारकरची होणार एण्ट्री : रमा-अक्षयच्या नात्यात येणार नवं वळण

4 second read
0
0
27

no images were found

मुरांबा मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरुची अडारकरची होणार एण्ट्री : रमा-अक्षयच्या नात्यात येणार नवं वळण

स्टार प्रवाहवरची मुरांबा ही मालिका तीन वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. प्रेक्षकांची लाडकी जोडी अर्थात रमा-अक्षयच्या नात्यात लवकरच नवं वळण येणार आहे. आता रमा-अक्षय नाही तर स्वरा-अक्षय ही नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरुची अडारकर स्वरा ही भूमिका साकारणार असून जवळपास १६ वर्षांनंतर ती स्टार प्रवाहच्या मालिकेत दिसणार आहे. 

स्वरा या पात्राविषयी सांगताना सुरुची म्हणाली, साधारण १६ वर्षांपूर्वी स्टार प्रवाहच्या ओळख या मालिकेने मला अभिनेत्री म्हणून खऱ्या अर्थाने ओळख दिली. पुन्हा एकदा स्टार प्रवाहच्या कुटुंबात येताना अतिशय आनंद होतोय. खरतर पॉझिटिव्ह व्यक्तिरेखा साकारायची होती आणि स्वरा या भूमिकेसाठी विचारणा झाली. स्वरा अतिशय सुंदर, हुशार आणि आत्मविश्वासू मुलगी आहे. प्रचंड हळवी असल्यामुळे तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. एकमेकांवर खरं प्रेम करणाऱ्या माणसांनी कधी दूर जाऊ नये असं स्वराचं मत आहे. त्यामुळे रमा-अक्षयच्या नात्यात स्वराच्या येण्याने नेमकं काय घडणार हे पहाणं उत्सुकतेचं असणार आहे. तेव्हा पाहायला विसरु नका मुरांबा दररोज दुपारी १.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…