अभिनेत्री मधुरा देशपांडेचं तीन वर्षांनंतर मालिका विश्वात दमदार पुनरागमन स्टार प्रवाहची नवी मालिका ‘शुभविवाह’मध्ये साकारणार भूमी ही व्यक्तिरेखा स्टार प्रवाहवरील सर्वच मालिकांना रसिक प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. नव्या वर्षात नव्या मालिकेची भेट प्रेक्षकांना देण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनी सज्ज आहे. प्रेक्षकांची दुपार आणखी खास करण्यासाठी १६ जानेवारी पासून स्टार प्रवाह परिवारात दाखल होतेय नवी मालिका ‘शुभविवाह’. सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुरा देशपांडे या मालिकेत …