no images were found
कलाकारांचे मन तृप्त करण्यासाठी आवडते पावसाळी स्नॅक्स!
कडक ऊन्हाळी ऋतूनंतर पावसाचे आगमन सुखदायक दिलासा घेऊन येते आणि आपल्या मनात आवडत्या स्वादिष्ट ट्रीट्सचा आस्वाद घेण्याची इच्छा निर्माण होते. पावसाळ्यामधील या तृष्णेची पूर्तता करण्यासाठी एण्ड टीव्ही कलाकारांनी त्यांच्या आवडत्या मान्सून स्नॅक्सबाबत सांगितले, जे स्वादिष्ट, आरोग्यदायी असण्यासोबत त्यांचा आस्वाद घेतलाच पाहिजे असे आहेत. हे कलाकार आहेत मोहित डागा (अशोक, ‘दूसरी माँ), योगेश त्रिपाठी (दरोगा हप्पू सिंग, ‘हप्पू की उलटन पलटन’) आणि विदिशा श्रीवास्तव (अनिता भाभी, ‘भाबीजी घर पर है’). मालिका ‘दूसरी माँ’मधील मोहित डागा ऊर्फ अशोक म्हणाले, ‘‘मध्यप्रदेशच्या मोहक दृश्यासह मान्सून सीझन माझ्यामध्ये नवचैतन्य जागृत करतो. हिरव्यागार निसर्गावर पाऊस पडण्यासह संपूर्ण राज्यामध्ये उल्लेखनीय परिवर्तन होते. या जादुई क्षणांदरम्यान मी मूगडाळीसह घरी बनवलेले मंगोडी आणि गरमागरम चहाचा आस्वाद घेतो. माझी आई संपूर्ण जगामध्ये सर्वात स्वादिष्ट मंगोडी बनवण्यामध्ये निपुण आहे. प्रामाणिकपणे सांगायचे तर मी मंगोडीचा आस्वाद घेण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाही आणि पावसाळा दूर असला तरी माझ्या आईला काही मंगोडी बनवून देण्यास सांगतो (हसतात). गरमागरम पोहे, सोबत जिलेबी आणि स्वादिष्ट कचोरी मला खूप आवडतात. मी सध्या मालिका ‘दूसरी माँ’साठी जयपूरमध्ये आहे, ज्यामुळे मला माझ्या आईच्या स्वादिष्ट पाककलांची आठवण येत आहे. तिच्या पाककला खास आहेत. पण, जयपूरमध्ये देखील
अनेक स्वादिष्ट खाद्यपदार्थ आहेत, जे माझ्या तृष्णेचे समाधान करतात. प्याज कचोरी, स्पाइसी मिरची वडा आणि दाल भाटी यांचा आस्वाद घेण्यासह मी सीझनमधील विविध फ्लेवर्सचा आस्वाद घेतो.’’
मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील योगेश त्रिपाठी ऊर्फ दरोगा हप्पू सिंग म्हणाले, ‘‘उत्तरप्रदेश स्वादिष्ट पाककलेसाठी प्रसिद्ध आहे आणि मान्सून सीझनदरम्यान ते माझ्यासारख्या फूडप्रेमींसाठी नंदनवन बनते (हसतात).
मला आवडणारा एक स्वादिष्ट खाद्यपदार्थ म्हणजे सिंघाडा, जो समोसा म्हणून देखील ओळखला जातो, त्यासोबत गरमागरम कुल्हडवाली चहा. या तोंडाला पाणी आणणाऱ्या ट्रीट्समध्ये बटाटे, शेंगदाणे व मसाल्यांचे स्वादिष्ट फिलिंग असते, जे मैदामध्ये बनवले जाते आणि तिखट चिंचेच्या चटणीसह सर्व्ह केले जाते. मुंबईमध्ये हा पदार्थ उपलब्ध असल्याचा मला आनंद होत आहे आणि पाऊस पडायला सुरूवात झाली की मी त्याचा आस्वाद घेणे कधीच चुकवत नाही. तसेच भाजलेला मका, ज्याला प्रेमाने ‘बुट्टा’ म्हणतात, तो मला या सीझनदरम्यान खूप आवडतो आणि तुम्हाला मी चालता-फिरता त्याचा आस्वाद घेताना पाहायला मिळेल.’’ मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील विदिशा श्रीवास्तव ऊर्फ अनिता भाभी म्हणाल्या, ‘‘मला पावसाळा खूप आवडतो, यामुळे मला माझ्या आवडत्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येतो. मुंबईमध्ये पावसाळ्यादरम्यान वातावरण अत्यंत प्रसन्न होऊन जाते, जे सर्वांचे लक्ष वेधून घेते. रस्त्यावरील प्रत्येक कोपऱ्यावर स्टॉल्स पाहायला मिळतात, जे चण्याच्या पीठामध्ये बटाटे व कांद्यांसह कुरकुरीत वडे व भजी सर्व्ह करतात. पावासोबत वडे व भजींचा आस्वाद अत्यंत उत्साहवर्धक अनुभव देणारा आहे. मी या स्टॉल्सच्या बाजूने जाते तेव्हा मला त्यांचा आस्वाद घ्यावासा वाटतो आणि मी स्वत:ला त्याबाबत रोखू शकत नाही. तसेच मला गरमागरम नूडल्स आणि गरमागरम कॉफी देखील आवडते. माझे मूळगाव वाराणसीमध्ये अनेक ठिकाणी काही स्वादिष्ट मिष्टान्ने पाहायला मिळतील. मला मोकळा
वेळ मिळाला की मी काशी भंडार येथे स्वादिष्ट टमाटर चाट आणि पालक चाटचा आस्वाद घेते, तसेच राम भंडार येथे कचोरी सब्जी व जिलेबीचा आस्वाद घेते.’’