no images were found
निक्की शर्मा म्हणते, “मी इतकं अफलातून चाट अन्यत्र कुठेही खाल्लेलं नाही!”
प्यार का पहला नाम राधा मोहन, तेरी मेरी इक जिंदरी आणि रब से है दुआ यासारख्या देशभरातील प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंत केलेल्या मालिकांनंतर ‘झी टीव्ही’ वाहिनी ‘स्टुडिओ एलएसडी प्रॉडक्शन्स’ या संस्थेच्या सहकार्याने ‘प्यार
का पहला अध्याय शिव शक्ती’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणणार आहे. मालिकेचे कथानक भारताची आध्यात्मिक राजधानी असलेल्या वाराणसीमध्ये घडते. आधुनिक प्रेमकथा असलेल्या या मालिकेत शिव आणि शक्ती
यांच्या भूमिका अनुक्रमे अर्जुन बिजलानी आणि निक्की शर्मा साकारणार असून मालिकेच्या पहिल्याच प्रोमोने असंख्य प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मालिकेचे कथानक, त्यातील कलाटण्या आणि व्यक्तिरेखा यांच्याबद्दल सर्वत्र उत्सुकता
निर्माण झाली असून प्रेक्षकांमध्ये मालिका पाहण्याची उत्कंठा निर्माण झाली आहे.
या मालिकेतील कलाकारांनी अलीकडेच मालिकेच्या पहिल्या काही भागांचे आणि प्रोमोचे चित्रीकरण वाराणशी शहरात केले आणि निक्की शर्मा प्रथमच पवित्र तीर्थस्थान असलेल्या वाराणशीत आली होती. त्यामुळे शहराच्या विविध भागांना भेटी देण्यास ती खूपच उत्सुक होती. वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेण्याप्रमाणेच स्थानिक स्वादिष्ट व्यंजनांचा आस्वाद घेण्यासही तिने अग्रक्रम दिला होता. मालिकेच्या चित्रीकरणाचे प्रदीर्घ वेळापत्रक पार पडल्यानंतर वाराणशीत आल्याचा पुरेपूर लाभ उठविण्याचा निक्की शर्माने निर्णय घेतला आणि स्थानिक स्वादिष्ट चाट, बनारसी पान, लिट्टी चोखा, आलू कचोडी आणि अन्य काही पदार्थांवर ताव मारला. निक्की शर्मा म्हणते,
“वाराणशीतील स्वादिष्ट खाद्यपदार्थांबद्दल मी खूप ऐकलं होतं. आम्ही त्या शहरात चित्रीकरण करणार असल्याचं जेव्हा मला कळलं, तेव्हा मी तिथे काय काय खायचं, त्याची यादीच बनविली. मी जन्मजात खवय्यी आहे. मी ज्या ज्या शहरात जाते, तिथले स्थानिक स्वादिष्ट पदार्थ खाण्यावर मी कटाक्ष ठेवते. त्यामुळे रोज चित्रीकरण संपल्यावर मी आमच्या टीमसह काशी चाट भाण्डार या प्रसिध्द दुकानात गेले. आम्ही राहात असलेल्या हॉटेलपासून ते जवळच होतं. तिथे आम्ही आलू कचोडी, टमाटर चाट, लिट्टी चोखा, चाट खाल्लं आणि अर्थातच त्याची सांगता बनारसी पान खाऊन केली. यापैकी टमाटर चाट हा अगदी नवा पदार्थ मी चाखला. तो खूपच वेगळा होता आणि आम्हा सर्वांनाच तो खूप आवडला. मी यापूर्वी इतकं अफलातून चाट कुठे खाल्लेलं नव्हतं. तिथलं खाणं आणि माणसं वगैरे सर्वकाही अगदी योग्य होतं. तिथले स्थानिक लोक तुमच्याशी ज्या प्रकारे वागतात, त्या शहराशी संबंधित अनेक गोष्टी तुम्हाला सांगतात, शहराचा इतिहास तुम्हाला ऐकवितात आणि तुम्हाला नवे पदार्थ खाण्यास प्रवृत्त करता। ते सर्वच फार अदभुत आहे. मला तो अनुभव फारच सुंदर वाटतो.” वाराणशीत आपल्या सहकलाकारांबरोबर चित्रीकरण करताना निक्की शर्माला चांगला अनुभव आल्याचे दिसते. निक्की शर्माला नव्या रूपात पाहण्यास तिचे चाहते खूप उत्सुक झाले असले, तरी प्यार का पहला अध्याय शिव शक्तीची कथा पाहणे निश्चितच उत्कंठावर्धक ठरेल. शिव शक्ती यांच्यातील नात्याचे आजच्या संदर्भातील स्वरूप पाहणे रंजक ठरेल. शिव आणि शक्ती यांची आख्यायिका पाहण्यासाठी 3 जुलैपासून संध्याकाळी 7.30 वाजता पाहा ‘प्यार का पहला अध्याय शिव शक्ती’ फक्त ‘झी टीव्ही’वर!