Home मनोरंजन हल्ला थांबवून गणेशाने तक्षकाला क्षमाशीलतेची ताकद दाखवली

हल्ला थांबवून गणेशाने तक्षकाला क्षमाशीलतेची ताकद दाखवली

4 second read
0
0
36

no images were found

हल्ला थांबवून गणेशाने तक्षकाला क्षमाशीलतेची ताकद दाखवली

सोनी सबवरील ‘गाथा शिव परिवार की – गणेश कार्तिकेय’ या मालिकेत भगवान शिव (मोहित मलिक), देवी पार्वती (श्रेनु परीख) आणि त्यांची मुलं गणेश (एकांश काथरोटिया) आणि कार्तिकेय (सुभान खान) यांच्या फारशा न ऐकलेल्या कथा सादर करण्यात  येत आहेत. ही मालिका पारंपरिक पौराणिक कथेसारखी नसून या दैवी कुटुंबातील नातेसंबंध, त्यांचे संघर्ष, विजय आणि कर्तव्यासोबतच त्यांच्या भावभावना यांचा शोध या मालिकेत घेतला आहे.

आगामी भागांमध्ये, नागलोकाचा सामर्थ्यशाली राजा तक्षक (अमित पचोरी) यास मूषक राजचा धक्का लागतो, ज्यामुळे तो संतापतो. अपमानित झालेला तक्षक संतापाच्या भरात गणेशावर हल्ला करतो. अहंकाराने आंधळा झालेला तक्षक गणेशावर धावून जातो. तक्षकाचा प्रतिकार करण्यास सज्ज असलेला गणेश मात्र प्रतिहल्ला न करता थांबतो आणि त्वेष आवरून क्षमा करण्याचे ठरवतो. या दिव्य कृपेमुळे तक्षकाचे हृदय परिवर्तन होते. गणेशाची अपार ताकद आणि त्याची करुणा पाहून त्याला स्वतःची चूक समजते. पश्चात्तापाने वरमलेला तक्षक क्षमायाचना करतो आणि गणेशाची सेवा करण्याची इच्छा व्यक्त करतो. भक्तीच्या या प्रतीकात्मक क्षणी, तक्षकाचा भाऊ शेषनाग गणेशाच्या जानव्याच्या रूपात गणेशाच्या देहावर रुळतो. गणेशाचे दिव्य रूप पूर्ण होण्याच्या प्रक्रियेतील ही एक घटना आहे.

गणेशाची भूमिका करत असलेला एकांश काथरोटिया म्हणतो, “या भागात गणेशाची भूमिका करणे माझ्यासाठी खूप खास होते, कारण या भागात खूप सुंदर संदेश होता. तक्षक संतापून गणेशावर हल्ला करतो, तरीही त्याच्याशी युद्ध करण्याऐवजी गणेश जी त्याला क्षमा करण्याचे ठरवतात. हे शूटिंग करत असताना दयाळूपणा किती महान असू शकतो हे मला उमगले. गणेश जेव्हा हल्ला होत असताना मध्येच थांबून तक्षकला एक संधी द्यायचे ठरवतात, तो क्षण माझा आवडता क्षण होता. मला अशा आहे की, प्रेक्षकांना आणि माझ्या सारख्या मुलांना हे दृश्य खूप आवडेल आणि क्षमाशीलतेमुळे एखाद्याचे हृदयपरिवर्तन होऊ शकते हा संदेश त्यांना मिळेल.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

घराला पूर्णत्व देणाऱ्या बाईची हृदयस्पर्शी कथा ‘बाई तुझा आशीर्वाद’

घराला पूर्णत्व देणाऱ्या बाईची हृदयस्पर्शी कथा ‘बाई तुझा आशीर्वाद’ मराठी मालिका विश्वात नेह…