Home मनोरंजन  ‘एकेन बाबू’ची हिंदीत डबिंग केलेली आवृत्ती लॉन्च 

 ‘एकेन बाबू’ची हिंदीत डबिंग केलेली आवृत्ती लॉन्च 

21 second read
0
0
27

no images were found

 एकेन बाबूची हिंदीत डबिंग केलेली आवृत्ती लॉन्च 

दिनांक 24 नोव्हेंबर रोजी सोनी सब वाहिनीवर ‘एकेन बाबू’ची हिंदीत डबिंग केलेली आवृत्ती लॉन्च होणार आहे, तर त्या अगोदर सुंबुल तौकीर खान, श्रेनु परीख, करुणा पांडे तसेच या वाहिनीवरील अन्य लोकप्रिय कलाकारांनी या अतरंगी डिटेक्टिव्हचे आगळेवेगळे विश्व कसे आहे याचा संक्षिप्त परिचय आपल्या चाहत्यांना करून दिला आहे.

या प्रसिद्ध बंगाली मालिकेच्या हिंदी टेलिव्हिजनवरील लॉन्चच्या निमित्ताने या कलाकारांनी एका खास एकेन बाबू टूलकिटचे अनावरण केले आणि त्याच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना या विक्षिप्त डिटेक्टिव्हच्या जगाची सुंदर झलक दाखवली. आपल्या वैयक्तिक प्रतिक्रिया शेअर करताना सुंबुल, श्रेनु आणि करुणाने प्रेक्षकांना अशा जगात पाऊल टाकण्यासाठी निमंत्रित केले, जेथे एकेन कुणी साचेबंद गुप्तहेर नाही तर एक लोभस, विक्षिप्त सामान्य माणूस आहे- जो चहा आणि झालमुरीचा आस्वाद घेत घेत किंवा आपल्या डायरीत काहीतरी चिरखडून एखादे प्रकरण सोडवून टाकतो. एकेन बाबू सोनी सबवर येणार म्हटल्यावर प्रेक्षकांना ती आपलेपणाची, कुतुहलाची आगळीवेगळी भावना जाणवू लागली आहे.

‘गणेश कार्तिकेय’ मालिकेत देवी पार्वतीच्या भूमिकेत लोकप्रिय झालेल्या श्रेनु परीखने एकेन बाबूची ओळख त्याच्या साधेपणात आणि तल्लख बुद्धिमत्तेत असल्याचे सांगितले आहे.

https://www.instagram.com/p/DRRnr7NDGnR/?hl=en

‘इत्ती सी खुशी’ मालिकेतील भावनिक आणि प्रामाणिक अभिनयाबद्दल कौतुकास पात्र ठरलेली अभिनेत्री सुंबुल तौकीर खान हिने सांगितले की एकेन बाबू कसे डिटेक्टिव्हच्या पारंपरिक प्रतिमेला आव्हान देतो. एरवी अनेक गुन्हेगारी मालिका गंभीर स्वरूपाच्या असतात, पण तिने एकेन बाबूच्या विक्षिप्त आणि खाद्यप्रेमी स्वभावाचा उल्लेख केला आहे.

       ‘पुष्पा इम्पॉसिबल’मधील शीर्षक भूमिकेत गाजत असलेली अभिनेत्री करुणा पांडेने आपल्या खास मोहक शैलीत एकेन बाबूच्या मोहकतेवर भर दिला आहे-

https://www.instagram.com/p/DRRwZHqjbz8/?hl=en

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

घराला पूर्णत्व देणाऱ्या बाईची हृदयस्पर्शी कथा ‘बाई तुझा आशीर्वाद’

घराला पूर्णत्व देणाऱ्या बाईची हृदयस्पर्शी कथा ‘बाई तुझा आशीर्वाद’ मराठी मालिका विश्वात नेह…