Home शासकीय संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामाची प्रशासकांकडून पाहणी

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामाची प्रशासकांकडून पाहणी

22 second read
0
0
28

no images were found

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामाची प्रशासकांकडून पाहणी

पहिल्या टप्प्यातील ठेकेदार लक्ष्मी हेरिकॉन्स यांचे काम पूर्ण, टप्पा तीन व चार अंतर्गत कामे गतीने सुरु

कोल्हापूर, (प्रतिनिधी) : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या सुरू असलेल्या नूतनीकरण व विकासकामाची आज महानगरपालिकेच्या प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी पाहणी केली. यावेळी नाट्यगृहाच्या चारही टप्प्यांतील कामांचा संबंधित ठेकेदारांकडून सविस्तर आढावा घेण्यात आला. पहिल्या टप्प्यातील ठेकेदार लक्ष्मी हेरिकॉन्स यांचे काम पूर्ण झाले असून, प्रकल्प सल्लागार स्ट्रक्टवेल यांच्यामार्फत कामाची तपासणी करून अहवाल सादर करण्याबाबत प्रशासकांनी सूचना दिल्या.

       दुसऱ्या टप्प्यातील ठेकेदार व्ही. के. पाटील यांच्यामार्फत नाट्यगृहाशी संबंधित ग्रीनरूमचे काम पूर्ण झाले आहे. तसेच कलादालन व बाल्कनीच्या जिन्याचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यासोबतच खासबाग स्टेज व तटबंदीचे कामही तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. तिसऱ्या व चौथ्या टप्प्यातील ठेकेदार गोदरेज कंपनी यांना एकॉस्टीक पॅनेल, कारपेट व बैठक व्यवस्थेच्या नमुन्यांची तपासणी करून प्रकल्पाचे उर्वरित काम दि. २५ मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होईल, अशा पद्धतीने कामाचे नियोजन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

       सध्या टप्पा तीन व चार अंतर्गत बाल्कनी, स्टेज, विद्युतीकरण, अग्निशमन व्यवस्था, ग्रीनरूम व प्रसाधनगृहांचे काम एकाच वेळी गतीने सुरू असून या कामकाजाबाबत प्रशासकांनी समाधान व्यक्त केले.

       यावेळी शहर अभियंता रमेश मस्कर, सहाय्यक अभियंता सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता अनुराधा वांडरे, व्यवस्थापक समीर महाब्री, स्ट्रक्टवेल कंपनीचे राजेश यादव, सुनील पोवार, श्रीनिवास सुलगे, अभियंता व्ही. के. पाटील तसेच गोदरेज कंपनीचे अभियंता महेश पांचाळ उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय
Comments are closed.

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…