
no images were found
बाबा रामदेव यांच्या मंदिर जीर्णोध्दार उत्सवाला भाविकांच्या उपस्थितीत प्रारंभ
कोल्हापूर: ( प्रतिनिधी )देशभरात असंख्या मंदिरं आणि भक्तगण लाभलेल्या बाबा रामदेव महाराज यांचं कोल्हापूर-सांगली मार्गावरील शिरोलीनजीक पुरातन मंदिर आहे. या मंदिराच्या जीर्णोध्दार सोहळयाला आजपासून प्रारंभ झाला. बारा बलुतेदार राजस्थानी समाजाचे आदरस्थान असलेले श्री रामदेव बाबा यांच्या मंदिराच्या प्रांगणात शास्त्री विक्रम प्रसाद यांच्या हस्ते सकाळच्या सत्रात होमहवन करण्यात आलं. दिवसभर भाविकांनी होमहवन आणि रामदेवजीबाबा यांचं दर्शन घेतलं. सायंकाळी मंदिरात सांध्वीजींचं आगमन झालं. तसंच कोल्हापूर ते श्रीमंत शाहू छत्रपती यांनी देखील मंदिरात भेट देवून रामदेवबाबांचं दर्शन घेतलं. त्यांचं राजस्थानी पगडी बांधून समाज बांधवांनी स्वागत केलं. बाबा रामदेव यांच्याविषयी श्रीमंत शाहू महाराज यांनी माहिती घेतली. तसंच बारा बलुतेदार राजस्थानी समाज बांधवांना मार्गदर्शन केलं. यावेळी माजी नगरसेवक ईश्वर परमार, संयोजक मोहब्बतसिंग देवल, गुमानसिंग देवडा, शांतीलाल पुरोहित, हिरालाल पुरोहित यांच्यासह भाविक उपस्थित होते.