
no images were found
मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांची सभा यशस्वी करू : श्री.राजेश क्षीरसागर
कोल्हापूर : मे.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर प्रथमच मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांचे कोल्हापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या विचारानुसार ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सूत्रानुसार काम करत असून, अनेक लोकहिताच्या निर्णयासह विकासाचे काम त्यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार कडून होत आहे. शासन आपल्या दारी या अभियानाच्या माध्यमातून सरकारी योजनांचा थेट लाभ नागरिकांना व्हावा, या उद्देशाने मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेबांनी या अभियानाची सुरवात केली असून, त्यांची दि.२८ मे २०२३ रोजी गांधी मैदानात होणारी सभा यशस्वी करू, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले. मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या कोल्हापुरातील गांधी मैदानात होणाऱ्या सभेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची राजर्षी शाहू स्मारक भवन येथे बैठक पार पडली.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, शिवसेनेची स्थापना करताना शिवसेनाप्रमुखांनी नागरिकांच्या गरजा ओळखून त्यांना तात्काळ न्याय मिळावा हे डोळ्यासमोर ठेवून शाखाप्रमुख, गटप्रमुख अशी खोल बांधणी केली. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवदुतांच्या नेमणुका सुरु असून, सर्वसामान्य कष्टकरी नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा. शासन आणि नागरिक यांच्यामध्ये शिवदूत हे दुवा म्हणून काम करणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शासनाने विविध योजना सुरु केल्या आहेत. मिस कॉल वर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून वैद्यकीय मदत मिळणार आहे. या कामाचे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. त्यामुळे कोल्हापुरात होणाऱ्या सभेला सर्वसामान्य, कष्टकरी जनता स्वयंस्फूर्तीने लाखोंच्या संख्येने उपस्थित राहील. त्यामुळे शिवसैनिकांनी नियोजन बद्ध काम करून, २८ तारखेची सभा यशस्वी करूया, असे आवाहन केले.
यावेळी खासदार श्री.संजय मंडलिक यांनी, मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी राज्याला गतिमान सरकार दिले असून, कोल्हापूरवर विशेष प्रेम असणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी हजारो कोटींचा निधी गेल्या काही महिन्यातच कोल्हापूर जिल्ह्याला दिला आहे. त्यामुळे विकासाचे आणि लोकहिताचे निर्णय लोकांपर्यंत पोहचवून सभा यशस्वी करूच यासह मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांचे करवीर नगरीत जल्लोषी स्वागत करू, असे सांगितले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, जिल्हाप्रमुख राजेखान जमादार, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव यांनीही मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक जिल्हा नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर यांनी केले. यावेळी मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे नचिकेत खरात, जिल्हाप्रमुख रविंद्र माने, मा.नगरसेवक नंदकुमार मोरे, जयवंत हारुगले, महेंद्र घाटगे, बिंदू मोरे, प्रा.शिवाजी पाटील, किशोर घाटगे, रमेश खाडे, उदय भोसले, संजय संकपाळ, प्रशांत साळुंखे, महिला आघाडीच्या सौ.मंगलताई साळोखे, शाहीन काझी, मंगलताई कुलकर्णी, गौरी माळदकर आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते