Home शासकीय लाखो वारकऱ्यांना सरकारकडून विमा संरक्षण, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

लाखो वारकऱ्यांना सरकारकडून विमा संरक्षण, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

0 second read
0
0
24

no images were found

लाखो वारकऱ्यांना सरकारकडून विमा संरक्षण, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

 

मुंबई, 21 जून : लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या 30 दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल. यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस 5 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास 1 लाख रुपये देण्यात येतील. अंशत: अपंगत्व आल्यास 50 हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी 35 हजार रुपयापर्यंतचा खर्च येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे.

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला लाखो वारकरी वारीत सहभागी झाले आहेत. या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

सरकारच्या खर्चातून हे विमा संरक्षण असणार आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

सरकारकडून याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येईल. वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होतात आणि त्यात वारकरि जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…