
no images were found
राज्यात पुन्हा वीज दरवाढ
महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेला आता शिंदे सरकार आणखी एक झटका बसणार आहे. राज्यात पुन्हा एकदा वीज दरवाढ होणार आहे. किमान 60 पैसे प्रति युनिट वाढ होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्याचे वीज बिल किमान 200 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिश्याला पुन्हा कात्री लागणार आहे. महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेला आता शिंदे सरकार पुन्हा एकदा झटका देणार आहे. राज्यात विजेच्या दरात 10 ते 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय शिंदे सरकारने आधीच घेतला आहे.
आता नोव्हेंबर महिन्यात पुन्हा दरवाढ होणार आहे. वीज खरेदी खर्चातील वाढीपोटी महावितरणने 1500 कोटी रुपये राखीव ठेवले होते. तो निधी 2021 मध्येच संपला आहे. त्यामुळे महावितरणने 1 एप्रिल 2022 मध्ये खरेदीच्या वाढीपोटी इंधन समायोजन शुल्क आकारण्यास सुरुवात केली.सध्या हे शुल्क १.३० रुपये प्रति युनिट इतके आहे. आता पुढील महिन्यात महावितरण 60 ते 70 पैशांची वाढ करणार आहे.