
no images were found
एक बेभान प्रेमकथा झिंगाड…. प्रेम फुलणार की त्यात अडचणी येणार.पहा ऑगस्ट मध्ये
आजच्या तरुणाईला आवडेल अशी ही कथा आहे. या कथेद्वारे लोकांना निश्चितच प्रेम, एकतेचा संदेश मिळेल. अगदी निखळ मनोरंजन करणारा हा चित्रपट असल्याचे निर्माते रणजित भिसे यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कौटुंबिक नाट्य असलेल्या या चित्रपटात एक बेभान प्रेमकहाणी पहायला मिळणार आहे. त्यांचं प्रेम फुलणार की त्यात अडचणी येणार हे जाणून घेण्यासाठी आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल.
आकांक्षा चित्र प्रस्तुत आणि रणजित भिसे निर्मित, आनंद शिशुपाळ दिग्दर्शित झिंगाड हा मराठी चित्रपट 18 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. झिंगाड च्या निर्मात्यांनी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केलं आहे. प्रतिभावान अभिनेत्री लाजरी देशमुख आणि मिलिंद भोसले
‘झिंगाड’ या आगामी मराठी चित्रपटात झळकणार आहे.
दिग्दर्शक आनंद शिशुपाळ म्हणाले की,मी या चित्रपटाबाबत खूपच उत्सुक आहे. नाटयमय वळणांची हि खूप गोड, लव्ह बर्ड स्टोरी आहे. मला खात्री आहे की प्रेक्षकही चित्रपट पाहिल्यानंतर आकर्षित होतील. मी देखील चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे.
चित्रपटाची कथा आणि निर्मिती रणजित भिसे यांची आहे. आनंद शिशुपाळ दिग्दर्शित या चित्रपटात मिलिंद भोसले, लाजरी देशमुख, शाहरुख शेख, वैशाली तिवडे, मेहबूब मुल्ला, विनायक बेडके, कृष्णा पाटील, अक्षय कोठारी आदी कलाकार झळकणार आहेत.