Home Uncategorized  छत्रपती शाहु महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन

 छत्रपती शाहु महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन

6 second read
0
0
49

no images were found

 छत्रपती शाहु महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन

 

      कोल्हापूर : जिल्हा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत छत्रपती शाहु महाराज युवा शक्ती करिअर शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास पालकमंत्री, खासदार, आमदार यांची उपस्थिती असणार असून शिबीरामध्ये इयत्ता 10 वी व 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी तज्ञ व्याख्याते मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एम.एस.आवटे यांनी दिली आहे.

 शिबीर अमृतसिध्दि मल्टीपर्पज हॉल, कळंबा येथे बुधवार दि. 12 जून 2024 रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेत तसेच केशवराव भोसले नाट्यगृह, मंगळवार पेठ, कोल्हापूर येथे मंगळवार दि. 18 जून 2024 रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेत तर श्री स्वामी समर्थ लॉन, सांगरुळ, ता. करवीर येथे शुक्रवार दि. 21 जून 2024 रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेत होणार आहे.

 शिबीरामध्ये दहावी, बारावी नंतरचे महाविद्यालयीन शिक्षण व अभ्यासक्रम, महाविद्यालयीन अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया, कलमापन चाचणी, शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना व कर्ज योजना माहिती व करिअर प्रदर्शिनी या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…