Home शैक्षणिक शिवाजी विद्यापीठाच्या वतीने रायगड स्वच्छता मोहीम संपन्न

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने रायगड स्वच्छता मोहीम संपन्न

0 second read
0
0
24

no images were found

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने रायगड स्वच्छता मोहीम संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधी):  शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजना कक्ष व डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, शिवाजी विद्यापीठ, यांचा संयुक्त विद्यमाने यावर्षी शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या निमित्ताने रा से यो च्या ३०० स्वयंसेवकांनी रायगडावर स्वच्छता व प्लास्टिक मुक्ती करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. शिवाजी विद्यापीठाच्या वतीने दि. २ जून ते ८ जून या कालावधीत ३०० स्वयंसेवकांसह रायगड परिक्रमा शिवराजधानीची, किल्ले रायगड स्वच्छता मोहीम पार पाडण्यात आली. या मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राविषयी स्वयंसेवकांना सविस्तर माहिती देण्यात आली. इतिहास अभ्यासक डॉ. इंद्रजीत सावंत यांनी आपल्या खास शैलीत विद्यार्थ्यांना राजधानी रायगड आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास याबद्दल पुराव्यासह माहिती सादर केली. शिबिराच्या दुसऱ्या दिवशी शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी शिवाजी महाराजांच्या यशस्वी मोहिमां बद्दल आणि महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी केलेल्या कार्याबद्दल माहिती दिली.

दि. ५ जून, २०२४ रोजी म्हणजेच शिवराज्याभिषेक दिनाच्या आदल्या दिवशी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयं सेवकांनी संपूर्ण रायगडची स्वच्छता केली. स्वच्छतेमध्ये ३०० बॅक प्लास्टिक संकलन व इतर कचरा संकलन त्याचबरोबर पर्यावरण रक्षणाबाबत घोषणा आणि फलकांद्वारे जनजागृती केली. दि. ७ जून, २०२४ रोजी पुन्हा रायगडावर निर्माण झालेल्या कचरा तसेच प्लास्टिक संकलित करून ते रिसायकलिंग साठी पाठवण्यात आले. या स्वच्छता मोहिमे अंतर्गत रायगड किल्ल्यावरील होळीचा माळ ते जगदीशश्वर मंदिर मार्ग, राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळ परिसर,राजसदर परिसर, बाजारपेठ परिसर तसेच रोपवेपर्यंतच्या रस्त्यावरील साफसफाई आणि महादरवाजा ते चित्त दरवाजा या गडउतार होण्याच्या पाई मार्गावर स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहीम राबवली. सुमारे ४५० बॅग प्लास्टिक स्वयंसेवकांनी संकलित केले. याबरोबरच स्वयंसेवकांनी रायगडावर राज्याभिषेक दिनी मोफत अन्नछत्र दिलेल्या समिती चे सर्व साहित्य गडापासून रोपेपर्यंत पोहोचण्याच काम केले. या शिबिरात रा से यो कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक अमोल कुलकर्णी, डॉ. के एस शिंदे, डॉ. क्षत्रिय, प्रा. संदीप पाटील व प्रा. मोरे यांनी शिबिराचे संयोजन केले. या मोहिमेस राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य श्री सिद्धार्थ शिंदे यांनी भेट देऊन स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. ही मोहिम विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. टी एम चौगले यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्या परिश्रम व सक्रीय सहभागाने सदरची मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. या मोहिमेसाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के, प्र कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव, डॉ. व्ही. एन. शिंदे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…