no images were found
दूरशिक्षण केंद्राच्या वतीने ‘पीएच.डी.प्रवेश परीक्षा तयारी’ कार्यशाळा
कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्यावतीने पीएच.डी.प्रवेश परीक्षासाठी दि.०८ जानेवारीपासून ‘पीएच. डी. प्रवेश परीक्षा तयारी कार्यशाळा’ ऑनलाईन आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे यांनी दिली. शिवाजी विद्यापीठाच्या वतीने पीएच.डी. प्रवेश प्रक्रियेसाठी २०२३-२४ साठी इच्छुक पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज दि.१०/०१/२०२४ पर्यंत मागविण्यात आलेले आहेत. उच्च शिक्षणाचे उद्धिष्ट हे विद्यार्थ्यांना वैज्ञानिक ज्ञान देण्याबरोबर नवीन ज्ञानाची निर्मिती करणे देखील आहे. जगात बहुतांश संशोधन हे विद्यापीठ आणि महाविद्यालय पातळीवर शिक्षकांकडून केले जाते. शिक्षकांनी केलेल्या संशोधनामुळे अध्यापनाच्या गुणवत्तेत व शिकविण्यामध्ये सुधारणा होते. ज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च पदवी म्हणून पीएच.डी.ला अनन्यसाधारण महत्व आहे. याबाबी लक्षात घेऊन दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या वतीने दि.८ जानेवारी ते दि.१२ जानेवारी २०२४ दरम्यान ‘पीएच.डी. प्रवेश परीक्षा तयारी’ कार्यशाळा ऑनलाईन आयोजित
केलेली आहे.
कार्यशाळा दोन भागात होणार असून त्यामध्ये पहिल्या भागात परीक्षेविषयी सामान्य माहिती व संशोधन पद्धती यावर समन्वयक डॉ.के.बी.पाटील मार्गदर्शन करणार आहेत.तसेच दुसऱ्या भागात नाईट कॉलेजचे मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.अरुण शिंदे (मराठी), सातारा येथील शिवाजी कॉलेजचे राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.एस.एस.पाटील (राज्यशास्त्र), अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.व्ही,पी.कट्टी (अर्थशास्त्र), समाजशास्त्र अधिविभागाचे प्रा.डॉ.जगन कराडे (समाजशास्त्र) ,प्रा.डॉ.भारतभूषण माळी (इतिहास), चिपळूण येथील डी.बी.जे.कॉलेज गणित अधिविभागातील प्रा.डॉ.एम.एस.बापट (गणित), वाणिज्य अधिविभाग प्रमुख प्रा.डॉ.ए.एम.गुरव
(वाणिज्य/व्यवस्थापन / अकौटन्सी ) हे प्राध्यापक विषयानिहाय मार्गदर्शन करणार आहेत.तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी https://forms.gle/yqjqC1RkzMdrA4Yn6 या गुगल फॉर्मद्वारे नावनोंदणी करून अधिक माहितीसाठी व्हाटसअप ग्रुप ला जॉईन व्हावे असे आवाहन संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे यांनी केले आहे.